इचलकरंजी, शहरात झिकाची आणखीन एका व्यक्तीस लागण झाली आहे. राधाकृष्ण चौक परिसरातील ही व्यक्ती असून रुग्णालयातून घरी आणल्यानंतर या व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था पुणे यांनी याबाबतचा अहवाल दिला आहे. त्यामुळे महानगरपालिकेच्या आरोग्य खात्याची यंत्रणा पुन्हा सक्रिय झाली आहे. शहरात झिकाचा दुसरा रुग्ण आढळून आल्याने महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून विविध उपाययोजना सुरु करण्यात आल्या आहेत. राधाकृष्ण चौक परिसरात रूग्ण पॉझिटीव्ह आल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून आणखीन ३० संशयित व्यक्तींच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले आहेत. आरोग्य विभागाच्या वतीने घरोघरी सर्वेही सुरु करण्यात आला आहे.
राधाकृष्ण चौक, सर्वोदयनगर, कापड मार्केट हौसिंग सोसायटी, हिरकणी हॉटेल परिसर, राजराजेश्वरीनगर आदी परिसरात धूर फवारणी करण्यात आली. अंगणवाडी सेविका, आशा वर्कर्स आदींसह सुमारे १०५ पथकांच्या माध्यमातून सर्व्हे करण्यात येत आहे. आजअखेर १ लाख २८ हजार ६९३ नागरिकांचा सर्व्हे पूर्ण करण्यात आला. बुधवारी दिवसभरात ३ हजार ३३७ घरांचा सर्व्हे करण्यात आला असून २८ हजार १०७ नागरिकांची माहिती घेण्यात आली.
या सर्व्हेदरम्यान १७२ घरांमध्ये ईडीस इजिप्त डासाच्या अळ्या आढळून आल्याने त्या नष्ट करण्यात आल्या. झिका रुग्णाच्या संपर्कात आलेल्यांसह शहरातील अन्य ठिकाणच्या ३० संशयितांच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले आहेत. ते तपासणीसाठी राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेकडे पाठविण्यात आले आहेत.
इचलकरंजीत ‘झिका’च्या पार्श्वभूमीवर आरोग्य खाते पुन्हा अलर्ट!
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -