राजस्थानमधील दौसा जिल्ह्यातील महवा विधानसभा मतदारसंघातील अपक्ष आमदार ओमप्रकाश हुडला यांनी एका चपलाच्या दुकानात आपल्या कार्यकर्त्यांचे आणि जनतेचे बूट पॉलिश केल्याचा प्रकार समोर आला आहे.
यावेळी शूज पॉलिश करण्यासाठी जे काही पैसे मिळाले ते आमदारांनी दुकानदाराला दिले. मतदार मोठा आणि आमदार छोटा असा संदेश या माध्यमातून द्यायचा आहे, असे त्यांनी सांगितले.जनतेचे बूट पॉलिश करताना आमदार ओमप्रकाश म्हणाले की, मी मतदार व कार्यकर्त्यांचे बूट पॉलिश करण्याचा संकल्प केला आहे. यातून आमदार छोटा आणि मतदार मोठा याची जाणीव कार्यकर्त्यांना आणि मतदारांना करून द्यायची आहे.
आमदार हा मतदार आणि कार्यकर्ता यांचा सेवक आहे. आज मी आमच्या विधानसभा मतदारसंघातील हजारो कार्यकर्त्यांचे बूट पॉलिश करण्याचे काम केले आहे. आमदाराने सर्वसामान्य जनतेचे सेवक म्हणून काम केले पाहिजे, हाच त्याचा संदेश आहे.
- हे काम आपण यापूर्वीही केले आहे, आजही करत आहोत आणि भविष्यातही करत राहू.