आखाती देशात सध्या भारताच्या भूमिकेचीच चर्चा सुरु आहे. सध्या मध्य-पूर्व देशात, आखाताजवळ इस्त्राईल-हमास युद्ध भडकले आहे. आखातीतील देशांनी हमासची, पॅलेस्टाईनची बाजू उचलून धरली आहे. हा भाग अशांत झाल्याने हे देश नाराज झाले आहेत. पण त्यांना सर्वाधिक धक्का या युद्धापेक्षा भारताच्या भूमिकेने बसला आहे. भारताने आखाती देशांचे तेल काढले आहे. कच्चा तेलासाठी भारताने आतापर्यंत याच देशांना पसंती दिली होती. पण गेल्या एक वर्षांपासून भारताने पसंती क्रम बदलवला आहे. गेल्या सहा महिन्यात तर भारताने आखाती देशाकडे जणू पाठ फिरवली आहे. रशियाला सर्वाधिक पसंती दिली आहे.
रशियाचा दबदबा
भारताच्या क्रूड ऑईल बास्केटमध्ये आतापर्यंत आखाती देशांचा एकछत्री अंमल होता. 2022 मध्ये रशिया-युक्रेन युद्धानंतर समीकरणं बदलली. रशिया भारताला स्वस्तात कच्चे तेल देण्यास तयार झाला. त्याचा फायदा भारतीय कंपन्यांना काही प्रमाणात झाला. रशिया अजून ही भारताला इतर देशांपेक्षा स्वस्तात इंधनाचा पुरवठा करत आहे. त्यामुळे या बास्केटमध्ये रशियाचा वाटा एकदम वाढला आहे. तर आखाती देशाकडील आयात एकदम रोडावली आहे.
असा वाढला वाटा
भारताने यंदा एप्रिल ते सप्टेंबर दरम्यान आर्थिक वर्ष 2023-24 च्या पहिल्या सहामाहीत सरासरी 1.76 दशलक्ष बॅरल प्रति दिवस अशा प्रमाणात रशियाकडून इंधनाची खरेदी केली. तर गेल्या वर्षी याच कालावधीत हे प्रमाण 7,80,000 बॅरल प्रति दिवस असे होते. आकडेवारीनुसार जुलै ते ऑगस्ट या दरम्यान भारताने रशियाकडील तेल आयात कमी केली होती.
मध्य-पूर्वेतील देशांना फटका
एप्रिल ते सप्टेंबर महिन्यात मध्य-पूर्वेतील देशांपेक्षा भारताने कच्चा तेलासाठी रशियाला प्राधान्य दिले आहे. इराक आणि सौदी अरबकडे कमी मागणी नोंदवली आहे. इराक आणि सौदी अरबकडील तेलाची आयात क्रमशः 12 टक्के आणि 23 टक्क्यांनी घसरली आहे. ती 928,000 प्रति बॅरलवरुन 607,500 बॅरलपर्यंत घसरली आहे. या दरम्यान मध्यपूर्वेतील तेलाची आयात 28 टक्क्यांनी कमी झाली आहे.
रशिया झाला भारताचा टॉप ऑईल सप्लायर, येणार का पेट्रोल स्वस्ताई
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -