प्रत्येक ‘लव्हस्टोरी’मागे काहीतरी खास गोष्ट असते. प्रत्येक लव्हस्टोरीची एक केमेस्ट्री असते… बॉलिवूड सेलिब्रिटी कायम त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल सांगतात आणि चाहत्यांना कपल गोल्स देत असतात.
सध्या अभिनेता रणवीर सिंग आणि अभिनेत्री दीपिका पादुकोण यांच्या लव्हस्टोरीची चर्चा रंगत आहे. दीपिका हिने लग्नाआधी अनेक सेलिब्रिटींना डेट केलं. अभिनेत्रीने डिप्रेशनचा देखील सामना केला. पण अखेर दीपिका हिच्या आयुष्यात रणवीर सिंग याची एन्ट्री झाली आणि सर्वकाही बदललं. रणवीर याने दिग्दर्शक करण जोहर याच्या ‘कॉफी विथ करण’ या शोमध्ये प्रेमाची सुरुवात कशी झाली याबद्दल सांगितलं आहे.
रणवीर याने सांगितलं की, त्याच्या आणि दीपिका हिच्या नात्याची सुरुवात ‘गोलियों की रासलीला राम लीला’ सिनेमापासून झाली. ‘सिनेमात माझ्यासोबत अभिनेत्री करीना कपूर झळकणार होती. पण काही कारणांमुळे तिने सिनेमा करण्यास नकार दिला. तेव्हा दिग्दर्शक संजय लिला भंसाळी आणि मी चर्चा करत होतो, सिनेमात कोणत्या अभिनेत्रीला घ्यायचं..’
पुढे अभिनेता म्हणाला, ‘तेव्हा दीपिका हिचा ‘कॉकटेल’ सिनेमा प्रदर्शित झाला होता. तर मिटिंगसाठी मी दीपिका हिच्या आधी संजय यांच्या घरी पोहोचलो. संजय यांचं घर समुद्र किनारी आहे. काही वेळाने घराचा दरवाजा उघडला आणि दीपिका चिकनकारी ड्रेसमध्ये घरात आली… दीपिका समोर आल्यानंतर मी तिच्याकडे पाहातच राहिलो…’
‘दीपिका, संजय लिला भंसाळी यांच्या घरी आली. सिनेमावर चर्चा झाली. आम्ही एकत्र जेवण केलं… त्यानंतर दुसऱ्या दिवसापासून आम्ही एकमेकांना भेटू लागलो…’ सांगयचं झालं तर, करीना हिने सिनेमाला नकार दिल्यामुळे दीपिका हिला ‘गोलियों की रासलीला राम लीला’ सिनेमात मुख्य भूमिका साकारण्याची संधी मिळाली.
‘गोलियों की रासलीला राम लीला’ सिनेमाच्या शुटिंग दरम्यान रणवीर आणि दीपिका यांच्यामध्ये प्रेम बहरलं… आज रणवीर आणि दीपिका त्यांच्या आयुष्यात आनंदी आहेत. महत्त्वाचं म्हणजे, रणवीर कामय त्याच्या अनोख्या अंदाजात दीपिका हिच्यावर असलेलं प्रेम व्यक्त करत असतो.
सोशल मीडियावर देखील रणवीर आणि दीपिका यांचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात. शिवाय रणवीर आणि दीपिका दोघेही सोशल मीडियावर कायम सक्रिय असतात. त्यांच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.