Tuesday, July 29, 2025
Homeब्रेकिंगमाजी केंद्रीय मंत्री बबनराव ढाकणेंचं निधन, वयाच्या 87व्या वर्षी अखेरचा श्वास

माजी केंद्रीय मंत्री बबनराव ढाकणेंचं निधन, वयाच्या 87व्या वर्षी अखेरचा श्वास

 

 

माजी केंद्रीय राज्यमंत्री बबनराव दादाबा ढाकणे (Babanrao Dhakne) यांचं निधन झालं असून ते 87 वर्षांचे होते. गुरुवारी रात्री त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या तीन आठवड्यांपासून ते न्युमोनिया आजारानं ग्रस्त होते.त्यांच्यावर अहमदनगर (Ahmednagar) येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, त्यांची प्रकृती खालावली आणि गुरुवारी रात्री त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यातच त्यांचं निधन झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.

 

माजी केंद्रीय मंत्री बबनराव ढाकणे यांचं दीर्घ आजाराने निधन झालं. अहमदनगरच्या साईदीप रुग्णालयात वयाच्या 86 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. बबनराव ढाकणे हे चार वेळा आमदार आणि एक वेळा खासदार म्हणून निवडून आले होते. राज्यात आणि केंद्रात ढाकणे यांनी मंत्रिपद भूषवलं होतं.

 

उद्या पाथर्डीत अंत्यसंस्कार

 

मागील 12 दिवसांपासून न्युमोनिया आजारावर ते उपचार घेत होते. मात्र सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास हृदयविकाराच्या झटक्यानं त्यांचं निधन झालं. बबनराव ढाकणे यांचं पार्थिव आज पाथर्डी येथील हिंदसेवा वसतिगृहामध्ये आज दुपरी एक ते उद्या दुपारी एक वाजेपर्यंत अंतदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. शनिवारी दुपारी दोन वाजता पाथर्डी तालुक्यातील पागोरी पिंपळगाव त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील.

 

बबनराव ढाकणे यांचा जन्म 10 नोव्हेंबर 1937 मध्ये महाराष्ट्रातील अकोल्यात झाला. महाराष्ट्रातील बीड लोकसभा मतदारसंघातून जनता दलतर्फे ते लोकसभेवर निवडून गेले होते. याआधी त्यांनी गोवा मुक्तिसंग्रामातही सहभाग घेतला होता. बबनराव ढाकणे चंद्रशेखर यांच्या सरकारमध्ये उर्जा संसाधनमंत्री होते.

 

माजी केंद्रीय मंत्री बबनराव ढाकणे यांचा प्रदीर्घ आजाराने आज अहमदनगर येथील साईदीप हॉस्पिटलमध्ये निधन झालं. बबनराव ढाकणे हे माजी केंद्रीय मंत्री असून ते चंद्रशेखर यांच्या सरकारमध्ये उर्जा संसाधनमंत्री होते. 1994 साली महाराष्ट्रात पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री राहिले होते. अहमनगर जिल्ह्यातील दुष्काळी पाथर्डी तालुक्यातील अकोले या छोट्याश्या गावात 10 ऑक्टोबर 1937 ला एका शेतकरी कुटूंबात त्यांचा जन्म झाला. घरातून कोणताही राजकीय वारसा नव्हता. शिक्षणासाठी पाथर्डीच्या हिंद वसतिगृहात राहताना चळवळीत ओढले गेले. गोवा समुक्ती संग्रामात भाग घेण्यासाठी शाळा नववीत असताना सोडून दिली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -