ताजी बातमी/ ऑनलाइन टीम
इचलकरंजीचा माजी नगरसेवक सुनिल शंकरराव तेलनाडे आज सोमवारी शरणागती पत्करत न्यायालयात हजर झाला. यावेळी त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले.
त्याच्यावर मोकांर्तगत कारवाई केली होती. तेव्हापासून तो फरार होता. तब्बल पाच वर्षानंतर सोमवारी सुनिल तेलनाडे हजर झाल्याने पोलिसांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे.
तेलनाडे याचेवर खून, मारामारी आदी प्रकारचे विविध पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल आहेत.
दरम्यान तेलनाडे न्यायालयात हजर होण्याची कुणकुण लागताच पोलिसांनी न्यायालयाच्या परिसरात मोठा पोलीस फौजफाटा तैनात केला होता.