ताजी बातमी ऑनलाईन टीम
कोल्हापूर : भंगाराची वाहतूक करीत असल्याचे सांगून ७२ लाखांची गोवा बनावटीची दारू घेऊन जाणारा ट्रक राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या विभागीय भरारी पथकाने पकडला. संशयित ट्रकचालक जगदीश देवाराम बिश्नोई (रा. भाटीप, जि. जालोर, राजस्थान) याला पथकाने अटक केली. ही कारवाई सोमवारी (दि. ३०) पहाटे इन्सुली (ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग) येथे झाली.
सावंतवाडीमार्गे गोवा बनावटीच्या दारूची अवैध वाहतूक होणार असल्याची माहिती उत्पादन शुल्कचे विभागीय उपआयुक्त विजय चिंचाळकर यांना मिळाली होती. त्यानुसार भरारी पथकाने सावंतवाडीजवळ इन्सुली येथे सापळा लावला होता. पथकाने सोमवारी पहाटे संशयित ट्रक अडवला. चालकाकडे चौकशी केली असता, त्याने भंगाराची वाहतूक करीत असल्याचे सांगितले.
मात्र,झडती घेतल्यानंतर ट्रकमध्ये गोवा बनावटीच्या दारूचे एक हजार बॉक्स आढळले. यातील ४८ हजार बाटल्यांची किंमत ७२ लाख रुपये आहे. पथकाने दारूचा साठा आणि ३० लाखांचा ट्रक असा सुमारे एक कोटी दोन लाखांचा मुद्देमाल जप्त
केला.
ट्रकचालक बिश्नोई याला अटक केली असून, त्याने मद्यसाठा कोणाकडून आणला आणि पुढे कोणाला पाठवला जाणार होता, याचा शोध घेण्याचे काम सुरू असल्याची माहिती विभागीय उपायुक्त चिंचाळकर यांनी दिली. ही कारवाई सिंधुदुर्गचे प्रभारी अधीक्षक वैभव वैद्य, निरीक्षक संजय मोहिते, तानाजी पाटील, प्रदीप रास्कर, गोपाळ राणे, दीपक वायदंडे, प्रसाद माळी, रणजीत शिंदे यांच्या पथकाने केली.
कोल्हापूर : भंगाराच्या ट्रकमध्ये मिळाली ७२ लाखांची दारू
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -