Sunday, December 22, 2024
Homeक्रीडाकोलकात्यातील सेमी फायनलवर पावसाचे सावट, हवामान विभागाने दिला इशारा

कोलकात्यातील सेमी फायनलवर पावसाचे सावट, हवामान विभागाने दिला इशारा

 

ऑस्ट्रेलिया-दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये १६ नोव्हेंबरला एकदिवसीय विश्वकरंडकाची उपांत्य फेरी रंगणार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील दोन बलाढ्य देशांमधील या लढतीवर जगभरातील तमाम क्रिकेटप्रेमींच्या नजरा खिळल्या आहेत. मात्र दोन देशांमधील या लढतीदरम्यान पावसाचा व्यत्यय येण्याची शक्यता आहे. त्यामुळे दोन्ही देशांचा या लढतीत कस लागेल.ऑस्ट्रेलिया-दक्षिण आफ्रिका यांच्यामधील उपांत्य फेरीचा सामना कोलकता येथील ईडन गार्डन्स स्टेडियमवर रंगणार आहे. हा सामना येत्या गुरुवारी होणार आहे. या लढतीदरम्यान पावसाचा व्यत्यय येणार आहे. हवामान विभागाकडून याबाबत माहिती देण्यात आली आहे. सकाळी ९ वाजता, दुपारी ३ वाजता आणि रात्री ९ वाजता पावसाच्या सरी येणार आहेत. याचे पडसाद लढतीवर पडण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -