Sunday, December 22, 2024
Homenewsशिवसैनिकांनी भाजप कार्यालय फोडले

शिवसैनिकांनी भाजप कार्यालय फोडले

कल्याणमध्ये शिवसैनिकांनी भाजप कार्यालय फोडले
Shiv Sena vs BJP जनआशीर्वाद यात्रे दरम्यान केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात आक्षेपार्ह विधान केल्याने राणे यांच्या निषेधार्थ राज्यभरात आंदोलनाचा भडका उडाला आहे. संतप्त शिवसैनिकांकडून राणे यांचा विविध प्रकारे आंदोलन करून निषेध व्यक्त केला जात आहे.
त्यातच मंगळवारी कल्याण पश्चिम भागातील कल्याण भाजपाच्या शहर कार्यालयावर शिवसैनिकांनी हल्ला केला. यावेळी काही भाजपचे कार्यकर्ते आडवायला आले असता दोन्ही गटात जोरदार हाणामारी झाली. मात्र याच दरम्यान संतप्त शिवसैनिकांनी भाजपाचे कार्यालय फोडल्याने परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला.


कल्याण पश्चिम भागातील अहिल्याबाई होळकर चौकात भाजपाचे शहर कार्यलय आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विधानावरून मंगळवारी कल्याण-डोंबिवलीतील शिवसैनिक आक्रमक झाल्याचे पहायला मिळाले.

त्यामुळे पोलिसांनी भाजपाच्या ठिकठिकाणी असलेल्या कार्यलयालाबाहेर बंदोबस्त तैनात केला. असे असतानाही कल्याण पश्चिम भागातील अहिल्याबाई होळकर चौकात भाजपा शहर कार्यालयावर शिवसैनिकांनी हल्लाबोल केला.
या कार्यलयाची शिवसेना आमदार विश्वनाथ भोईर आणि कल्याण शहरप्रमुख विजय उर्फ बंड्या साळवी यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांडून तोडफोड करण्यात आली. यावेळी तेथे उपस्थित असलेल्या भाजपाच्या काही कार्यकर्त्यांनी शिवसैनिकांना रोखण्याचा प्रयत्न केला.
मात्र, त्यानंतर आक्रमक शिवसैनिक आणि भाजपा कार्यकर्त्यांमध्ये झोंबाझोंबी झाली. एकीकडे या घटनेनंतर कल्याण शहरात तणावणाचे वातावरण पसरले होते.


मात्र, पोलिसांनी घटनास्थळी तात्काळ कुमक दाखल करून बंदोबस्त तैनात केला. या घटनेचे वृत्त कळताच भाजपाच्याही कार्यकर्त्यांनी आपल्या कार्यालयाकडे धाव घेतली. कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांनी दक्षता घेतली आहे.
त्यामुळे या भागात तणावपूर्ण शांतता पसरली आहे. तर दुसरीकडे या प्रकरणी बाजारपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असल्याचे सांगण्यात आले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -