Sunday, July 27, 2025
Homeइचलकरंजीतारदाळ-हातकणंगले रोडवर अपघात : पती-पत्नी जखमी

तारदाळ-हातकणंगले रोडवर अपघात : पती-पत्नी जखमी

ताजी बातमी /ऑनलाईन टीम

हातकणंगले तारदाळ रोडवर इंटरनॅशनल स्कूल समोर इंडीका व मोटर सायकल धडकेत मोटर सायकल चालक सुनिल ज्ञानू हुजरे (वय ६०) व पत्नी लता सुनिल हुजरे (वय ५५) हे पती पत्नी गंभीर जखमी झाले असून दोन्ही वाहनांचे प्रचंड नुकसान झाले आहे.

याबाबतची नोंद शहापूर पोलीस ठाण्यात झाली आहे. जाखले (ता. पन्हाळा) येथील हुजरे दाम्पत्य खोतवाडी येथील पाहुण्याच्या कडे कार्यक्रमा निमित्त आले होते.

ते आपल्या गावाकडे जात असताना इंटरनॅशल स्कूल मुख्य रस्त्यावरून येणाऱ्या इंडीका गाडीतील चालक विशाल शिंदे व सोन्या शिंदे यांचा ताबा सुटल्याने समोरून येणाऱ्या हिरो होंडा मोटर सायकलला जोराची धडक दिल्याने दुचाकी स्वार गाडीवरून प्रचंड वेगाने फेकले गेले.

त्यामुळे मोटर चालक सुनिल हुजरे यांचा उजवा पाय निकामी झाला आहे तर पत्नी ही गंभीर जखमी झाली आहे. घटनास्थळी बघ्यांनी एकच गर्दी केली होती. दोन्ही जखमीना कोल्हापूर येथील खाजगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -