Sunday, December 22, 2024
Homeदेश विदेशराष्ट्रीय पेन्शन योजनेची खाती लवकरच उघडणार, जाणून घ्या कोणत्या सेवेसाठी किती शुल्क...

राष्ट्रीय पेन्शन योजनेची खाती लवकरच उघडणार, जाणून घ्या कोणत्या सेवेसाठी किती शुल्क आकारणार?

National Pension Scheme: राष्ट्रीय पेन्शन योजनेची खाती लवकरच उघडणार, जाणून घ्या कोणत्या सेवेसाठी किती शुल्क आकारणार?

केंद्र सरकारकडून (Goverment) महिलांसाठी तसेच बालकांसाठी अनेक योजनांची तरतूद केली आहे. अगदी विद्यार्थ्यांसाठी देखील अनेक योजना राबवल्या जातात. या सगळ्या योजनांचा लाभ त्या त्या गटातील प्रत्येक गटाला होत असतो. तुम्ही जर सरकारी नोकरी करत असाल तर तुम्हाला पेन्शनचा लाभ मिळतो. पण जर तुम्ही खासगी नोकरी करत असाल तरी देखील तुमच्यासाठी पेन्शनची तरतूद होऊ शकते. ही तरतूद तुम्हाला राष्ट्रीय पेन्शन (National Pension Scheme) योजनेअतंर्गत मिळू शकते.

केंद्र सरकारकडून सुरु केलेली राष्ट्रीय पेन्शन योजना सेवानिवृत्त झालेल्या लोकांसाठी राबवली जाते. त्यामुळे सेवानिवृत्त झालेल्या लोकांना नोकरीनंतर उत्पन्न मिळण्यास मदत होते. निवृत्तीनंतर ही योजना गुंतवणूकदाराला दरमाहा चांगली रक्कम मिळून देण्यासाठी मदत करते. तसेच, या योजनेमध्ये तुम्हाला काही वर्षे आधी गुंतवणूक करावी लागेल जेणेकरुन ठराविक काळानंतर तुम्हाला व्याज दिले मिळेल. हा दीर्घकालीन गुंतवणुकीसाठीचा उत्तम पर्याय आहे.

ही पेन्शन योजना सेवानिवृत्तीनंतर पेन्शनची कमतरता भासू देत नाही. या योजनेचा लाभ घेण्यासाठी सुरुवातीला काही शुल्क आकारले जाते, ज्याविषयी माहिती करुन घेणे आवश्यक आहे. चला तर मग जाणून घेऊया या योजनेअंतर्गत तुम्हाला कोणते शुल्क आकारले जाईल.

 

पहिल्यांदा नोंदणी केल्यावर तुम्हाला 200 ते 400 रुपये शुल्क द्यावे लागेल.

e-NPS योजनेसाठी किमान 15 रुपये आणि कमाल 10000  सर्व NPS खात्यांसाठी लागू आहेत.

सर्वप्रकारच्या आर्थिक व्यवहारांसाठी 30 रुपये आकारले जातात

 

पर्सिस्टन्सी फी शुल्क

1000 ते 2999 रुपयांपर्यंतच्या रकमेसाठी पर्सिस्टन्सी फी म्हणून प्रतिवर्षी 50 रुपये आकारले जातात. तर 3000 ते 6000 रुपयांपर्यंतच्या रकमेसाठी 75 रुपये आणि 6000 रुपयांपेक्षा जास्त रकमेसाठी 100 रुपये आकारले जातात. पैसे काढण्यासाठी प्रक्रिया शुल्क 0.125 टक्के म्हणजेच किमान 125 रुपये आणि कमाल 500 रुपये आकारले जातील.

एनपीएस खाती किती प्रकारची आहेत?

एनपीएसमध्ये दोन प्रकारची खाती आहेत. पहिल्या प्रकारात पेन्शन खाते आहे आणि त्यावर करमुक्त सुविधा दिली जाती. तर दुसरं पर्यायी गुंतवणूक खाते आहे, ज्यात गुंतवणूक करण्यासाठी तुमचे पेन्शनचे खाते असणे आवश्यक आहे. गुंतवणूक खाते ही पेन्शन योजना नाही त्यामुळे त्यामध्ये तुम्ही हवे तेवढे पैसे गुंतवू शकता.

एनपीएसअंतर्गत कर नियम काय आहेत?

एनसीपीच्या कॉन्ट्रिब्यूशन सेक्शन 80 CCD अंतर्गत करासाठीची सूट दिली जाते. तर यामध्ये 50,000 पर्यंतची रक्कम वजा केली जाऊ शकते. पण ही रक्कम पेन्शन खात्याअंतर्गत केली जाऊ शकते.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -