Thursday, November 21, 2024
HomeबिजनेसShare Market | शेअर बाजाराची दहा वर्षांत गरुड झेप! 71000 अंकांचा ओलांडला...

Share Market | शेअर बाजाराची दहा वर्षांत गरुड झेप! 71000 अंकांचा ओलांडला टप्पा

 

दिवाळीपासून शेअर बाजाराने मोठी झेप घेतली आहे. तर मोदी सरकारच्या काळात गेल्या 9 वर्षांत बाजाराने उत्तुंग झेप घेतली आहे. शेअर बाजार अजून नवीन रेकॉर्ड करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. भारताच्या सकल उत्पादनाच्या आकड्यांनी जगाला आश्चर्याचा धक्का दिला. तसा आता भारतीय शेअर बाजाराच्या कामगिरीने जगातील गुंतवणूकदारांना आकर्षित केले आहे. भारतीय शेअर बाजार नवीन उच्चांकावर आहे. आज, शुक्रवारी शेअर बाजार पहिल्यांदा 71,000 हजार अंकांच्या पुढे गेला. मोदी सरकारच्या या कार्यकाळात सेन्सेक्स 116 टक्क्यांहून अधिक उसळला. 2014 ते 2023 या कार्यकाळात निर्देशांकाने 48,590 अंकांची गरुड झेप घेतली.

 

मे 2014 मध्ये सेन्सेक्स 22,493 अंकावर उघडा. याच महिन्यात नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदाची शपथ घेतली होती. याच मे महिन्यात सेन्सेक्स 27,499 अंकावर बंद झाला होता. त्यानंतर काही काळ निर्देशांक 19,963 अंकावर पण घसरला. बीएसईवर दिलेल्या काही आकड्यानुसार, निर्देशांकांनी 2014 च्या सुरुवातीला 21,222 अंकावर होता. याच वर्षी निर्देशांक 28,822 अंकांच्या उच्चांकावर पोहचला. या एका वर्षांत सेन्सेक्सने एकूण 6,277 अंकांची वाढ झाली.

 

वर्ष 2015 मध्ये शेअर बाजाराला धक्का लागला. शेअर बाजार 30,024 अंकावर पोहचला आणि त्यानंतर पुन्हा झटक्यात खाली आला. शेअर बाजार पुन्हा 22,494 च्या खालच्या स्तरावर आला. 2017 मध्ये बाजारात 7,345 अंकांची वाढ झाली. सेन्सेक्स यावर्षी 34,056 अंकावर पोहचला. 2018 हे वर्ष पण बरं निघालं. त्यानंतर बाजार 36,068 अंकावर बंद झाला. या काळात बाजार 2008 अंकांनी वधारला.

 

2019-2021 या काळात बंपर उसळी

 

मोदी सरकार पुन्हा सत्तेत आल्यानंतर शेअर बाजाराने पुन्हा मोठी उसळी घेतली. सेन्सेक्स 2019 मध्ये 5091 अंक, 2020 वर्षात 6401 अंक आणि 2021 मध्ये शेअर बाजार 10,468 अंकांची उसळी आली. दोन वर्षे कोरोनाने कहर केला. 2020 मध्ये निर्देशांकाने 47,896 अंकावर पोहचला. 2021 मध्ये सर्व रेकॉर्ड तोडत निर्देशांक 62,245 रुपयांच्या उच्चांकावर पोहचला.

 

2022-2023 मध्ये निर्देशांकची घौडदौड Share Market

 

बीएसईने दिलेल्या आकड्यानुसार, सेन्सेक्स 2022 मध्ये 58,310 अंकावर उघडला आणि तो वर्षाच्या अखेरीस 60,840 अंकाच्या स्तरावर पोहचला. 2023 च्या सुरुवातीला निर्देशांक 60,871 अंकावर पोहचला. आता 15 डिसेंबर रोजी बीएसई निर्देशाकांने ऑल टाईम हाय 71,084 अंकावर पोहचला. निर्देशांकाने 10,212 अंकांची तेजी नोंदवली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -