कोल्हापूर ; बारा वर्षीय मुलीला कोरोना
कोल्हापूर जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा देखील आता सतर्क झाली आहे. चार दिवसांपूर्वी कोल्हापूर शहरातील एका ५० वर्षीय व्यक्तीला कोरोनाच्या नव्या व्हेरियंटची लागण झाल्याने त्याच्यावर उपचार सुरू होते. शुक्रवारी रात्री करवीर तालुक्यातील एका १२ वर्षीय मुलीला देखील कोरोनाच्या नव्या व्हेरियंटची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. सध्या सीपीआर मधील कोरोना कक्षात तिच्यावर उपचार सुरू आहेत.