त्यावर चर्चा करण्यासाठी आज पालकमंत्री सुरेश खाडे यांच्या अध्यक्षतेखाली आणि खासदार संजय पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, पोलिस अधीक्षक डॉ. बसवराज तेली, रेल्वेचे अधिकारी सरोजकुमार यांच्या उपस्थितीत बैठक झाली. रेल्वेचे विभागीय अभियंता विकास कुमार ऑनलाइन चर्चेत सहभागी झाले. खासदार संजय पाटील यांनी टीकेची झोड उठवली. बैठकीनंतर पत्रकार परिषदेत माहिती देण्यात आली.
पालकमंत्री खाडे म्हणाले, ‘‘दोन महत्त्वाच्या शहरांना आणि जिल्ह्याच्या दोन भागांना जोडणारा हा पूल आहे. त्यावरून अवजड वाहतूक दीर्घकाळ बंद करणे परवडणारे नाही. अवजड वाहतूक वळवण्यासाठी पर्यायी चांगले रस्ते नाहीत. असा निर्णय घेणे कठीण आहे. हा पूल दुरुस्त करा आणि तो इतका मजबूत करा की अवजड वाहतूक सुरू राहिली पाहिजे. त्यासाठी सर्वोत्तम अभियंत्यांची मदत घ्या, अशा सूचना आम्ही दिल्या आहेत. रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याशी बैठकीतूनच चर्चा केली. रेल्वेचे अधिकाऱ्यांची हुकुमशाही खपवून घेतली जाणार नाही.’’