Sunday, December 22, 2024
Homeब्रेकिंगगर्लफ्रेंडला सोड अन् माझ्याकडे ये", उर्फी जावेदचं मुन्नवर फारुकीला प्रपोजल!

गर्लफ्रेंडला सोड अन् माझ्याकडे ये”, उर्फी जावेदचं मुन्नवर फारुकीला प्रपोजल!

 

 

Urfi Javed Propose Munawar Faruqui : ‘बिग बॉस 17’ (Bigg Boss 17) हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम आहे. गेल्या काही दिवसांपासून हा कार्यक्रम आणि त्यातील स्पर्धक विविध कारणांनी चर्चेत आहेत. ‘बिग बॉस 17’ (Bigg Boss 17) फेम विनोदवीर मुन्नवर फारुकीला (Munawar Faruqui) उर्फी जावेदने (Urfi Javed) थेट प्रपोज केलं आहे. गर्लफ्रेंडला सोड आणि माझ्याकडे ये, असं उर्फी त्याला म्हणाली आहे.उर्फी जावेद अनेकदा आपल्या हटके फॅशनसह वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत येत असते. आता मुन्नवर फारुकीबद्दल पापराझींसोबत बोलताना उर्फीने मुन्नवर आवडत असून बॉयफ्रेंड म्हणून तिला तोच हवा आहे, असं सांगितलं आहे. उर्फीने जाहीररित्या मुनव्वरला प्रपोज केलं आहे.

 

उर्फी जावेद काय म्हणाली?

उर्फी जावेद म्हणाली,”माझं मुन्नवरवर प्रेम आहे. मला तो आवडतो आणि आमच्यात काही घडणार असेल तर मला नक्कीच आवडेल. मुनव्वर खरचं एक चांगला मुलगा आहे. खूप खूप प्रेम मुन्नवर.. गर्लफ्रेंडला सोड आणि माझ्याकडे ये”.

 

मनारा, आयशानंतर आता उर्फीचा नंबर

उर्फी जावेदचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. आयशा खान, नजीला सीताशी आणि मनारा चोप्रा या तीन मुलींसोबतच्या नात्यामुळे मुन्नवर सध्या चर्चेत आहे. आता या यादीत उर्फी जावेदची भर पडली आहे.

 

पुनीत सुपरस्टारने घातलेली उर्फीला लग्नाची मागणी

उर्फी जावेदला याआधी पुनीत सुपरस्टारने लग्नाची मागणी घातली आहे. सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत त्याने उर्फीला लग्नासाठी विचारलं होतं. तो म्हणालेला,”उर्फी जावेद यार, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. गेल्या अनेक दिवसांपासून माझ्या मनातली एक गोष्ट मला तुला सांगायची आहे. पण कसं सांगावं हे कळत नाही. उर्फी मला तुझ्यासारखी मुलगी जोडीदार म्हणून हवी आहे. मी हात जोडून तुला विनंती करतो कृपया माझ्यासोबत लग्न कर”.

 

मुन्नवर फारुकी कोण आहे? (Who is Munawar Faruqui)

मुन्नवर फारुकी हा लोकप्रिय विनोदवीर आणि रॅपर आहे. कंगना रनौतच्या ‘लॉकअप’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्याने मनोरंजनसृष्टीत पदार्पण केलं. हा कार्यक्रम त्याने जिंकला होता. सध्या तो सलमान खानचा ‘बिग बॉस 17’ हा कार्यक्रम गाजवत आहे. मुन्नवरचा ‘बिग बॉस 17’चा विजेता व्हावा अशी चाहत्यांची इच्छा आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -