कोरोचीतील त्या खुणाचा उलघडा झाला आहे.त्यामध्ये पत्नीनेचे कारस्थान असून समोर आले आहे.
कोरोची येथील खुन प्रकरणी तिघांना अटक. अनैतिक संबंधात (relationship)पती अडथळा ठरत असल्याच्या कारणावरून पत्नीच्या प्रियकराने ट्रक मॅकेनिकल भारत पांडुरंग येशाळ (वय ३८ रा. रेणूकानगर, झोपडपट्टी,इचलकरंजी) याचा खून झाल्याचे पोलीस तपासात उघड झाले. स्थानिक गुन्हा अन्वेषणच्या पथकाने तेलंगणा राज्यातून तिघांना अटक केली. ७ जानेवारी रोजी कोरोची (ता.हातकणंगले) येथे रात्री येशाळ याचा खून झाला होता.
संशयित प्रियकर(relationship) मिरियाला यादगिरी महेश (वय २६), त्याचे दोघे साथीदार गजुला सत्यनारायण शिवशंकर (वय २७), मोहमद अमीर महंमद शरीफ खान (वय २४ रा. सर्व श्रीराम कॉलनी, पोचमा मंदिर मागे, सायबराबाद, जि. हैदराबाद, राज्य तेलंगणा) या तिघांना पोलीसांनी अटक केली आहे. हातकणंगले पोलीस ठाण्यात या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे.भारत येशाळ या ट्रक मिस्त्रीला ७ जानेवारी रोजी रात्री अज्ञात व्यक्तीने फोन करुन गाडी खराब झालेली आहे. असा बहाणा करुन कोरोची ते हातकणंगले जाणारे रोडवर असलेल्या चव्हाण टेक, हातकणंगले येथे बोलावून घेतले. धारदार हत्याराने त्याचे गळयावर, हातावर, पोटावर, छातीवर, पाठीवर, हनुवटी व गालावर वार करुन त्याचा खुन केला होता. त्याबाबत मयताचे वडील पांडुरंग अनंत येशाळ यांनी हातकणंगले पोलीसांत फिर्याद दिली होती.
गुन्हयाचे गांभीर्य लक्षात घेवून पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांना स्वतंत्र तपास पथक तयार करुन तपास गतिमान करण्याच्या सूचना दिल्या होत्या. एलसीबीने तीन पथकाद्वारे संबंधीत प्रकरणाचा शोध सुरू केला होता.
सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक व गोपनीय माहितीव्दारे हा गुन्हा मिरियाला यादगिरी महेश याने त्याच्या साथीदारांच्या मदतीने केला असल्याचे निष्पन्न झाले. पथकाने तेलंगणा राज्यात जावून, सापळा रचून गुन्हयातील संशयित मिरियाला यादगिरी महेश, गजुला सत्यनारायण शिवशंकर, मोहमद अमीर महंमद शरीफ खान सर्व राहणार तेलंगणा यांना अटक केली.
त्यांचेकडे कसून तपास केला असता यातील मुख्य आरोपी मिरियाला महेश याचे मयत भारत येसाळे याच्या पत्नीशी अनैतिक संबंध होते, याची माहिती मयत भारत येसाळे याला लागल्याने तो पत्नीस सतत त्रास देवून मारहाण करत होता. याच कारणावरुन भारत येसाळे याचा खून केल्याची कबुली संशयीत आरोपींनी पोलिसांना दिली. या खुनाचा छडा लावण्यात उप विभागीय पोलीस अधिकारी रोहिणी साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, सहा. पो. नि. प्रशांत निशाणदार, उपनिरीक्षक संदीप जाधव यांच्यासह पथकाने प्रयत्न केले.