Sunday, July 27, 2025
Homeब्रेकिंगचक्क पोलिस स्टेशन समोरच चोरी, मोबाईलच्या दुकानाला भगदाड पाडून लांबवली रोख रक्कम

चक्क पोलिस स्टेशन समोरच चोरी, मोबाईलच्या दुकानाला भगदाड पाडून लांबवली रोख रक्कम

डोंबिवलीतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे, ज्यामुळे चोरट्यांना पोलिसांचा काही धाक उरला आहे की नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे. डोंबिवलीमध्ये पोलिस स्टेशनच्या समोर असलेल्या एका दुकानातच चोरी झाल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला.डोंबिवलीमध्ये गेल्या काही दिवसांत गुन्ह्यांच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. मात्र पोलिसांनी चौफेर लक्ष ठेवत, अनेक गुन्हेगारांना जेरबंदही केले. मात्र आता डोंबिवलीतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे, ज्यामुळे चोरट्यांना पोलिसांचा काही धाक उरला आहे की नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे.

डोंबिवलीमध्ये पोलिस स्टेशनच्या समोर असलेल्या एका दुकानातच चोरी झाल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे.मोबाईलच्या दुकानाच्या छताला भगदाड पाडून चोरट्यांनी आत प्रवेश केला आणि मोबाईल्ससह, रोख रक्कमही लंपास केली. यासंदर्भात तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून लवकरच चोरट्यांचा शोध घेऊ असे डोंबिवली पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन गीते यांच्याकडून सांगण्यात आले मात्र पोलीस स्टेशन समोरील दुकानात चोरी करत चोरट्यांनी एक प्रकारे पोलिसांना आव्हानच दिले आहे.

नेमंक काय घडलं ?डोंबिवली पूर्व येथील रामनगर पोलीस ठाणे तसेच उपशहर वाहतूक कार्यालयाच्या समोर गणेश इलेक्स्ट्रिक हे मोबाईलचे दुकान आहे. या दुकानात शुक्रवारी रात्रीच्या सुमारास चोरीची घटना घडली. चोरट्यांनी दुकानाच्या छताला भगदाड पाडून दुकानात प्रवेश केला. त्यानंतर दुकानातील 7 महागडे मोबाईल व 60 हजाराची रोख रक्कम चोरून ते पसार झाले. दुकानातील मेहक सिंग यांनी ही माहिती दिली आहे. मोबाईलच्या या दुकानात रोज रात्री काही कामगार झोपतात, पण गेल्या काही दिवसांपासून दुकानात कोणी झोपत नव्हते असेही सिंग यांनी नमूद केले.

समोर पोलिस स्टेशन असूनही चोरट्यांनी बिनधास्सपणे दुकान फोडून त्यातील मोबाईल्स आणि रोख रक्कमही लांबवली. याप्रकरणी दुकान मालकाच्या तक्रारीवरून रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोरट्यांचा कसून शोध घेतला जात असल्याची माहिती रामनगर पोलिसांनी दिली. मात्र पोलीस स्टेशन समोरील दुकानातच चोरी करत चोरट्यांनी एक प्रकारे पोलिसांना आव्हानच दिले आहे, अशी चर्चा सध्या सर्वत्र रंगली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -