Saturday, December 21, 2024
Homeइचलकरंजीइचलकरंजीत धनादेश न वटल्याप्रकरणी एकास शिक्षा (CHEAK BOUNCE)

इचलकरंजीत धनादेश न वटल्याप्रकरणी एकास शिक्षा (CHEAK BOUNCE)

इचलकरंजीत धनादेश न वटता परत आल्याप्रकरणी नुकताच  सुनिल बळवंत तारदाळकर (रा. तिरंगा कॉलनी, कबनूर ) याला दोषी ठरवून येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांनी कोर्ट उठेपर्यंत शिक्षा व ३५ लाख ६१ हजार ७६३ रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले. नुकसान भरपाई न दिल्यास १ वर्ष सश्रम कारवासाची शिक्षा सुनावली.CHEAK BOUNCE

याबाबत अधिक माहिती अशी की, सुनिल तारदाळकर यांनी श्री आर्य चाणक्य पत संस्थेतून स्थावर तारण सहकर्जदार म्हणून कर्ज घेतले होते. त्याच्या फेडीपोडी पतसंस्थेला १७ लाख ८० हजार ८६८ रुपयांचा धनादेश दिला होता. मात्र तो न वटताच परत आल्याने येथील न्यायालयात तक्रार दाखल केली होती.CHEAK BOUNCE यावेळी झालेल्या सुनावणीमध्ये सुनिल तारदाळकर यांनी संस्थेत कायदेशीर देणेपोटी धनादेश दिला होता तो न वटता परत आल्याचे शाबीत केले. तसेच फिर्यादीचे वकील अँड. अशोक अग्रवाल यांनी मांडलेला युक्तीवाद ग्राह्य मानून करून न्यायालयाने वरील प्रमाणे शिक्षा सुनावली.CHEAK BOUNCE

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -