Tuesday, August 26, 2025
Homeमहाराष्ट्रशस्त्रक्रियेनंतर मोहम्मद शमी फोटो शेअर करत झाला भावूक, पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले…

शस्त्रक्रियेनंतर मोहम्मद शमी फोटो शेअर करत झाला भावूक, पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले…

भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीच्या टाचेवर यशस्वीरित्या ऑपरेशन झाले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून त्याला टाचेची दुखापत होत होती. त्यामुळे वनडे वर्ल्डकप स्पर्धेपासून तो क्रिकेटपासून दूरच होता. आता टाचेवर शस्त्रक्रिया झाल्यानंतर शमीने सोशल मीडिया पोस्टद्वारे ही माहिती दिली.शस्त्रक्रियेनंतरचा फोटो शेअर करताना मोहम्मद शमीने सांगितले की, त्याला त्याच्या पायावर उभे राहण्यासाठी थोडा वेळ लागेल. शमीच्या टाचेवर अकिलीस टेंडनची शस्त्रक्रिया झाली आहे.शमीने या शस्त्रक्रियेचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

“टाचातील अकिलीस टेंडनवर यशस्वी ऑपरेशन झाले. बरे होण्यास थोडा वेळ लागेल, पण मी पुन्हा माझ्या पायावर येण्यास उत्सुक आहे.”शस्त्रक्रियेमुळे शमी इंडियन प्रीमियर लीग 2024 मध्ये सहभागी होऊ शकणार नाही. मोहम्मद शमी आयपीएलमध्ये गुजरात टायटन्सचा भाग आहे. शमीने आयपीएल 2023 मध्ये पर्पल कॅप मिळवली होती. याशिवाय शमी आयसीसी टी20 विश्वचषक 2024 स्पर्धेलाही मुकणार आहे.सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर शमीचा फोटो शेअर करताना पंतप्रधान मोदींनी लिहिले, “तू लवकर बरा व्हावा आणि उत्तम आरोग्यासाठी मी तुला शुभेच्छा देतो.

मला विश्वास आहे की तू या दुखापतीवर पूर्ण धैर्याने मात करशील.”शमीने 2023 च्या विश्वचषकात अप्रतिम गोलंदाजी केली होती. शमीने संपूर्ण स्पर्धेत केवळ 7 सामने खेळले. पण या सामन्यांमध्ये त्याने 10.70 च्या सरासरीने सर्वाधिक 24 विकेट घेतल्या. 2023 च्या विश्वचषक स्पर्धेत त्याने तीन वेळा पाच किंवा त्याहून अधिक विकेट घेतल्या.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -