पेनी स्टॉक, जीटीएल इंन्फ्रास्ट्रक्चरची किंमत (GTL Infrastructure Share Price) सध्या 1.85 रुपये इतकी आहे. पण एकाच वर्षात या शेअरने गुंतवणूकदारांना मल्टिबॅगर रिटर्न दिला आहे. या शेअरने 115 टक्क्यांचा परतावा दिला आहेर. या छोटुरामवर अनेक बड्या कंपन्या फिदा आहेत. एलआयसीसह सार्वजनिक उपक्रमातील 4 कंपन्यांनी या शेअरमध्ये गुंतवणूक केली आहे. हा स्टॉक भविष्यातील लंबी रेस का घोडा ठरू शकतो. त्यामुळे या शेअरमध्ये गुंतवणूक वाढत आहे.
हा धोका पण ओळखा
जीटीएल इन्फ्रास्ट्रक्चरच्या शेअरने गेल्या सहा महिन्यात 60 टक्क्यांचा परतावा दिला आहे. वर्ष 2024 मध्ये आतापर्यंत या शेअरमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना 37 टक्क्यांचा नफा झाला आहे. येथे एक धोका पण आहे. केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने, सीबीआयने जीटीएल इन्फ्रास्ट्रक्चरविरोधात 4,063 कोटींच्या कथित बँक फसवणूकीप्रकरणात दुसरा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणात चौकशी सुरु आहे. तर पहिला गुन्हा हा 4500 कोटींच्या कथित घोटाळ्यासंबंधी आहे. तरी पण एकाही सार्वजनिक उपक्रमातील कंपनीने यातून गुंतवणूक कमी केलेली नाही, हे विशेष.
कोणाची किती गुंतवणूक?
LIC – चालू आर्थिक वर्षाच्या डिसेंबर तिमाहीनुसार, एलआयसीकडे जीटीएल कंपनीचे 42,61,77,058 शेअर, 3.33 टक्के वाटा आहे.
Bank of Baroda – या बँकेकडे जीटीएल इन्फ्रास्ट्रक्चरचे 5.68 टक्के वा 72,79,74,981 शेअर आहेत. अनेक दिवसांपासून या कंपनीत बँकेची शेअर होल्डिंग आहे.
Canara Bank – Q3FY24 मध्ये कॅनेरा बँकेकडे या कंपनीचे 51,91,15,428 शेअर होते. एकूण शेअरच्या हे 4.05 टक्के आहे. बँकेने दोन तिमाहीत या कंपनीतील हिस्सेदारी कायम ठेवली आहे.
Central Bank – डिसेंबर 2023 तिमाहीत जीटीएल इन्फ्रास्ट्रक्चरच्या शेअरहोल्डिंग पॅटर्ननुसार, सेंट्रल बँक ऑफ इंडियाने या पेनी स्टॉकमध्ये 94,21,54,365 वा 7.36 टक्क्यांची गुंतवणूक केली आहे. गेल्या दोन तिमाहीत ही गुंतवणूक कमी झालेली नाही.
Union Bank Of India – या बँकेने पण GTL इंफ्रास्ट्रक्चर लिमिटेडमध्ये गुंतवणूक केलेली आहे. डिसेंबर तिमाहीत बँकेकडे या कंपनीचे 1,54,62,71,529 शेअर होते. एकूण शेअरमध्ये हा वाटा 12.07 टक्के आहे. दोन तिमाहीत त्यात बदल झालेला नाही.