Thursday, November 21, 2024
Homeजरा हटकेनाश्त्याला झटपट बनवा चविष्ट दही सॅंडविच, जाणून घ्या ‘ही’ सोपी रेसिपी

नाश्त्याला झटपट बनवा चविष्ट दही सॅंडविच, जाणून घ्या ‘ही’ सोपी रेसिपी

 

सकाळच्या गडबडीमध्ये नाश्त्याला काहीतरी सोपे आणि टेस्टी(recipe) बनवायला सगळ्यांनाच आवडते. बरं दररोज पोहे, उपमा, शिरा इत्यादी पदार्थ खाऊन कंटाळा येतो. त्यामुळे, काहीतरी चवदार आणि हेल्दी खाण्याला सगळ्यांचे प्राधान्य असते. सॅंडविच हा एक असा पदार्थ आहे की, जो सकाळच्या गडबडीमध्ये लवकर बनवला जाऊ शकतो. या सॅंडविचचे अनेक प्रकार आहेत.

 

या प्रकारांपैकीच एक असलेला चवदार पदार्थ म्हणजे दही सॅंडविच(recipe) होय. हे दही सॅंडविच सोप्या पद्धतीने कसे बनवायचे? त्याची सोपी रेसिपी आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात दही सॅंडविच बनवण्याची ही सोपी रेसिपी. हे दही सॅंडविच सकाळी नाश्त्यामध्ये खाण्यासोबतच तुम्ही मुलांच्या टिफिनला ही देऊ शकता.

 

 

दही सॅंडविच बनवण्यासाठी लागणारे साहित्य :

१ वाटी दही

ब्रेडचे स्लाईस

बटर

लाल तिखट १ चमचा

चवीनुसार मीठ

काळी मिरी पावडर १ चमचा

चाट मसाला १ चमचा

बारीक चिरलेला कांदा १

बारीक चिरलेला टोमॅटो १

बारीक चिरलेली शिमला मिरची १

बारीक चिरलेली कोथिंबीर

 

दही सॅंडविच बनवण्याची सोपी पद्धत :

दही सॅंडविच बनवायला अतिशय सोपे आहे. हे सॅंडविच बनवण्यासाठी सर्वात आधी एका मोठ्या बाऊलमध्ये दही घ्या.

हे दही चमच्याच्या मदतीने चांगले फेटून घ्या.

आता या फेटलेल्या दह्यामध्ये बारीक चिरलेला कांदा, शिमला मिरची आणि टोमॅटो घाला.

सर्व गोष्टी चांगल्या प्रकारे एकत्र करून घेतल्यानंतर, त्यामध्ये मीठ, लाल तिखट, काळी मिरी पावडर, चाट मसाला हे सर्व मिसळा.

त्यानंतर, दही पुन्हा चांगले एकजीव करून घ्या.

आता या मिश्रणात बारीक चिरलेली कोथिंबीर घालून मिश्रण पुन्हा चांगले मिसळून घ्या.

आता तुमचे दही सॅंडविचचे मिश्रण तयार आहे. एका ब्रेड स्लाईसवर हे मिश्रण लावून घ्या.

त्यानंतर, दुसरा ब्रेड त्यावर ठेवून द्या.

दुसऱ्या बाजूला गॅसवर तवा किंवा पॅन गरम करायला ठेवा. त्यात बटर घाला आणि यामध्ये ब्रेडचे स्लाईस सोनेरी होईपर्यंत भाजून घ्या.

तुमचे दही सॅंडविच तयार आहे. हे गरमागरम सॅंडविच टोमॅटो सॉस आणि हिरव्या पुदिन्याच्या चटणीसोबत सर्व्ह करा.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -