Monday, December 23, 2024
Homeइचलकरंजीइचलकरंजीत आज पारंपारिक कर तोडण्याचा समारंभ

इचलकरंजीत आज पारंपारिक कर तोडण्याचा समारंभ

इचलकरंजी

कर्नाटक बेंदूर सणानिमित्त गावभागातील जुनी गावचावडी येथे शनिवार 22 जून रोजी सायंकाळी पाच वाजता शतकोत्तर परंपरा असलेला पारंपारिक कर तोडण्याचा कार्यक्रम आणि सणानिमित्त घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांचा बक्षिस वितरण समारंभ आयोजित करण्यात आला आहे.

या कार्यक्रमासाठी सहकार महर्षि कल्लाप्पाण्णा आवाडे, आमदार प्रकाश आवाडे, देवाशिष पाटील, शिवांशिष पाटील व विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत. इचलकरंजी शहरात संस्थान काळापासून कर्नाटकी बेंदूर साजरा करण्याची शतकोत्तर परंपरा आजही कायम आहे. इचलकरंजी शेतकरी तरुण व बेंदूर उत्सव मंडळाच्या वतीने जोपासण्यात आलेली आहे. इचलकरंजीचे जहागिरदार श्रीमंत ना. बा. घोरपडे यांच्या काळापासून दरवर्षी कर्नाटकी बेंदूर मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. यंदाही विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शनिवारी सायंकाळी जुनी गावचावडी येथे होणार्‍या कर तोडण्याचा व स्पर्धेचा बक्षिस वितरण समारंभास सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहन इचलकरंजी शेतकरी तरुण व बेंदूर उत्सव मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -