विधानसभेच्या निवडणुका तोंडावर आलेल्या आहेत. अशातच आता सरकारने महिलांसाठी अनेक योजना जाहीर केलेले आहेत. निवडणुकांचा विचार करता महिलांसाठी सरकार नवनवीन योजना आणत आहेत. अशातच आता सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहेत. या योजनेच्या माध्यमातून राज्य सरकारकडून महिलांना दर महिन्याला 1500 रुपये मिळणार आहे. आताही माझी लाडकी बहिण योजना (Mazi Ladki Bahin Yojana 2024) नेमकी काय आहे? त्याचा लाभ घेण्यासाठी काय काय प्रक्रिया करावी लागते?कोणती कागदपत्र लागतात? याबद्दलची माहिती आपण जाणून घेणार आहोत.
राज्य सरकारच्या या योजनेचा लाभ 21 ते 60 वयोगटातील विवाहित,विधवा, घटस्फोटीत आणि निराधार महिलांना मिळणार आहे.
योजनेची पात्रता
या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिला महाराष्ट्र राज्याची रहिवाशी असणे खूप गरजेचे आहे.
योजनेचा लाभ घेण्यासाठी महिला विवाहित,विधवा, घटस्फोटीत किंवा निराधार असली तरच तिला लाभ मिळणार आहे.
21 ते 60 वर्षे होईपर्यंत या योजनेसाठी महिला अर्ज करू शकतात.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांकडे बँक खाते असणे गरजेचे आहे.
योजनेचा लाभ घेण्यासाठी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे.
योजनेसाठी लागणारी महत्त्वाची कागदपत्र
योजनेचा ऑनलाईन अर्ज करायचा आहे.
महिलेकडे आधार कार्ड असणे गरजेचे आहे.
त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्याचे रहिवासी प्रमाणपत्र जन्म दाखला असणे गरजेचे आहे.
त्याचप्रमाणे समक्ष प्राधिकार्याने दिलेला कुटुंबप्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला गरजेचा आहे.
त्याचप्रमाणे बँक खाते, पासबुकाच्या पहिल्या पानाची प्रत.
पासपोर्ट आकाराचा फोटो.
रेशन कार्ड.
त्याचप्रमाणे योजनेच्या अटी आणि शर्तीचे पालन करण्याचे हमीपत्र.
अर्ज कसा करायचा ?
पात्र असलेल्या महिला या योजनेचा अर्ज पोर्टल, मोबाईल ॲप, सेतू सुविधा केंद्रावर जाऊन करू शकतात.
पात्र असलेली महिला ऑनलाईन पद्धतीने यासाठी अर्ज करू शकते.
ज्या महिलांना ऑनलाईन अर्ज करता येत नाही त्यांच्यासाठी अंगणवाडी केंद्र बाल विकास प्रकल्प ग्रामपंचायत वार्ड इत्यादी मधून अर्ज करता येईल.