Tuesday, October 22, 2024
Homeक्रीडाFREE FREE FREE! क्रिकेटप्रेमींना फुकट पाहता येणार वानखेडे स्टेडिअम, कधी कुठे आणि...

FREE FREE FREE! क्रिकेटप्रेमींना फुकट पाहता येणार वानखेडे स्टेडिअम, कधी कुठे आणि कसं? वाचा सविस्तर

क्रिकेट आवडणाऱ्या प्रत्येकालाच कधी ना कधी तरी वानखेडे स्टेडियम पाहता यावा, अशी मनापासून इच्छा असते. वानखेडे स्टेडिअम फुकट पाहण्याची संधी मुंबई क्रिकेट असोसिएशनने उपलब्ध केली आहे.

 

मुंबई महाराष्ट्रासह जगभरातील क्रिकेटप्रेमी हे वानखेडे स्टेडिअमच्या प्रेमात आहे. क्रिकेट आवडणाऱ्या प्रत्येकालाच कधी ना कधी तरी वानखेडे स्टेडियम पाहता यावा, अशी मनापासून इच्छा असते.

 

मुंबईतील प्रसिद्ध वानखेडे स्टेडियम पाहणं ही एक पर्वणीच असते. वानखेडे स्टेडियमवर क्रिकेटचे अनेक सामने होतात. पण हे सामने पाहण्यासाठी तिकीट आकारले जाते.

 

या तिकीटांचे दर सर्वसामान्य माणसांना परवडणारे नसतात. त्यामुळे अनेकांचे वानखेडे स्टेडियम पाहण्याचे स्वप्न कधीच सत्यात उतरत नाही.

 

पण आता मुंबईतील हेच वानखेडे स्टेडिअम पाहण्याची संधी मुंबई क्रिकेट असोसिएशनने उपलब्ध करुन दिली आहे. विशेष म्हणजे यासाठी तुम्हाला एकही रुपया द्यावा लागणार नाही.

 

टी-20 विश्वचषक जिंकल्यानंतर भारतीय संघ मायदेशी परतला आहे. आता लवकरच टीम इंडिया दिल्लीहून मुंबईत दाखल होणार आहे. भारतीय संघ मुंबईत दाखल झाल्यावर नरीमन पॉईंट ते वानखेडे स्टेडिअमपर्यंत त्यांची विजयी मिरवणूक काढली जाणार आहे.

 

या जंगी मिरवणुकीनंतर संध्याकाळी 7 वाजता मुंबईतील वानखेडे स्टेडिअमवर खेळाडूंची विजयी फेरी होणार आहे. ही विजयी फेरी पाहण्याची नामी संधी MCA ने उपलब्ध करुन दिली आहे.

 

मुंबई क्रिकेट असोसिएशनने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात त्यांनी सर्व माहिती दिली आहे. आज ४ जुलैला संध्याकाळी ४ नंतर वानखेडे स्टेडिअमचे गेट सर्वसामान्यांसाठी खुले केले जातील.

 

गेट क्रमांक २, ३ आणि ४ चा वापर करुन तुम्हाला स्टेडिअममध्ये प्रवेश दिला जाईल. विशेष म्हणजे यासाठी एकही रुपया किंवा कोणतेही तिकीट आकारलं जाणार नाही, असेही MCA ने म्हटलं आहे.

 

त्यामुळे जर तुम्ही क्रिकेटप्रेमी असाल किंवा तुम्हाला वानखेडे स्टेडिअम पाहण्याची इच्छा असेल, तर तुम्ही निश्चितच या संधीचा फायदा घेऊ शकता.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -