Sunday, February 23, 2025
Homeनोकरीबेरोजगरांसाठी मोठी बातमी!! येत्या वर्षात 10 हजार नोकऱ्या उपलब्ध होणार

बेरोजगरांसाठी मोठी बातमी!! येत्या वर्षात 10 हजार नोकऱ्या उपलब्ध होणार

सुशिक्षित बेरोजगरांची समस्या दिवसेंदिवस (Job Alert) वाढत आहे. अनेक तरुण-तरुणी रोज नोकरीसाठी पायपीट करताना दिसतात. बेरोजगारीच्या समस्येला तोंड देणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. सामाजिक कल्याण आणि राष्ट्रीय सेवेसाठी समर्पित असलेल्या हर्ष फाउंडेशनने महाराष्ट्रातील बेरोजगारीच्या गंभीर समस्येवर मात करण्यासाठी एक क्रांतिकारी उपक्रम हाती घेतला आहे. हर्ष फाउंडेशनचे संस्थापक आणि अध्यक्ष हर्षल शिंदे यांनी आज या उपक्रमाची घोषणा केली आहे. यावेळी त्यांनी दि. 7 ऑक्टोबर 2025 पर्यंत 10 हजार युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले आहे.

“राज्यात तसेच संपूर्ण देशभरातील वाढती बेरोजगारी एक (Job Alert) अत्यंत गंभीर समस्या आहे;” असे हर्षल शिंदे यावेळी म्हणाले. “बेरोजगारीमुळे तरुणांच्या मनात अस्थिरता निर्माण होते, ज्यामुळे नैराश्य आणि बिकट परिस्थिशी सामना करणं पेलत नसल्यामुळे आत्महत्या करण्याचे प्रमाण वाढते. बेरोजगारीमुळे अनेक तरुण चुकीच्या मार्गावर जाताना दिसतात ज्यामुळे समाजात गुन्हेगारी आणि व्यसनाधीनता वाढते. ही एक अतिशय गंभीर समस्या आहे आणि सरकार आणि प्रशासनाने सकारात्मक निर्णय घ्यायला हवेत;” असेही ते म्हणाले.

‘या’ उमेदवारांना मिळणार नोकऱ्या (Job Alert)

या उपक्रमाअंतर्गत, विविध क्षेत्रांमध्ये रोजगाराच्या बेरोजगरांसाठी मोठी बातमी!! येत्या वर्षात 10 हजार नोकऱ्या उपलब्ध होणार विस्तारित केल्या जातील, या माध्यमातून महिलांना आणि तृतीयपंथीय व्यक्तींनाही नोकऱ्या देण्यात येणार आहेत. हार्ष फाउंडेशन, महाराष्ट्रातील 19 जिल्ह्यांमध्ये दहा वर्षांहून अधिक काळ कार्यरत असून, ही संस्था अनेक प्रशंसनीय सामाजिक कल्याण उपक्रम राबवण्यात आघाडीवर आहे. या उपक्रमाअंतर्गत रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी रोवेट, ग्रॅनिझर, विश्वास ग्रुप आणि निर्मिती ग्रुप यांसारख्या संस्थांशी भागीदारी केली जाणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -