कोल्हापुरातील पूर ओसरल्यानंतर आता पुराची भीषणता दाखवणारी दृश्य समोर येत आहेत. पुराच्या पाण्याने गवताचे अख्ख शेत रस्त्यावर आले आहे. शेतकऱ्याने गवताच्या रानाला लावलेल्या कुंपणासह शेतच रस्त्यावर आले आहे.
कोल्हापूर रत्नागिरी रस्त्यावर आंबेवाडी गावाजवळ शेत जमीन वाहून आली आहे. वाहून आलेल्या या गवताच्या शेताचा आता वाहतुकीला अडथळा ठरला आहे. कोल्हापुरातल्या आंबेवाडीमधील पूर सुरू लागल्यानंतर आता पुन्हा आपल्या घरी परतू लागले. आंबेवाडी येथील नागरिकांनी घरातील पाणी बाहेर काढण्यासाठी कसरत करावी लागत आहे.

कुरुंदवाड भागात पूरपरिस्थिती तशीच आहे. पावसाने उघडीप दिल्याने पूरग्रस्त भागांना थोडासा दिलासा मिळाला आहे. कुरुंदवाड, नृसिंहवाडीसह अनेक प्रमुख मार्ग अजूनही पाण्याखाली आहेत. त्यामुळे दळणवळण यंत्रणा ठप्प झाली आहेत. या भागातील रस्ते कधी मोकळे होतील, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
कोल्हापूर रत्नागिरी रोडवरील आंबेवाडी,चिखली, केरली या गावातील लोक गेल्या तीन ते चार दिवसांपासून कोल्हापूरकडे येऊ शकले नव्हते. मात्र आताचे दैनंदिन व्यवहार सुरळीत होत आहेत. मात्र रस्त्यावरील पाणी पातळी कमी झाली असली तरी होत असलेल्या पाण्याला मोठा प्रवाह आहे. त्यामुळे नागरिकांनी धोका न पत्करता पुराच्या पाण्यातून प्रवास करू नये, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
कोल्हापूर सांगली जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे शिरोळ तालुका पुराचा फटका मोठ्या प्रमाणात बसत असतो दोन्ही जिल्ह्यातील पूर कमी होत असला तरी शेवटच्या टप्प्यामध्ये शिरोळ तालुक्यामध्ये 43 गावे व दोन शहरांना मोठ्या प्रमाणात बसत असतो.