तर सोयापेंड ३०२ डाॅलर प्रतिटनांवर होते. देशातही सोयाबीन दबावातच असून सोयाबीनला आजही ४ हजार १०० ते ४ हजार ४०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर उत्पादनवाढीच्या अपेक्षेने सोयाबीन बाजारात मंदी आहे. सोयाबीन बाजारातील ही स्थिती आणखी काही दिवस राहू शकते, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.
कापसू दबावातच
जागतिक बाजारात घटलेली मागणी आणि पुरवठा वाढीच्या अपेक्षेने बाजारात मंदी आहे. कापसाचा भाव गेले महिनाभर ७० सेंटच्या खालीच दिसत आहे. जागतिक अर्थव्यवस्थेत सध्या अनिश्चित परिस्थिती असल्याने त्याचा परिणाम कापसाच्या भावावर दिसून येत आहे.
आज दुपारपर्यंत कापसाचे वायदे ६८.९१ सेंट प्रतिपाऊंडच्या दरम्यान होते. देशातील बाजारातही सप्टेंबरचे वायदे ५७ हजार १३० रुपये प्रतिखंडीवर आहेत. तर बाजार समित्यांमधील भाव ७ हजार ते ७ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान होते. कापूस बाजारातील ही स्थिती आणखी काही दिवस कायम राहू शकते, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला.
कांद्याचा बाजार टिकून
देशातील बाजारात वाढलेल्या भावात कांद्याला उठाव काहीसा कमी झालेला दिसत आहे. त्याचा दरावरही परिणाम दिसून आला. कांद्याचा भाव ३ हजारांच्या पातळीवरून गेल्या दोन आठवड्यात नरमला आहे. सध्या कांदा २२०० ते २७०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. कांद्याची निर्यात किमान निर्यात मूल्य आणि निर्यात शुल्कामुळे कमी झालेली आहे. तरीही कमी पुरवठा आणि मागणी यामुळे कांदा बाजारातील दराची स्थिती कायम राहू शकते, असा अंदाज व्यापारी आणि अभ्यासक व्यक्त करत आहेत.
बाजारीची आवक कायम
बाजारीच्या बाजारातील स्थिती गेल्या दोन महिन्यांपासून कायम आहे. तर दुसरीकडे बाजारीला पावसामुळे काहीसा कमी उठाव मिळत असल्याचे व्यापारी सांगत आहेत. याचा परिणाम बाजरीच्या भावावर दिसून येत आहे. बाजारातील आवक सध्या सरासरीपेक्षा कमीच आहे. मात्र बाजारीचा बाजार स्थिर आहे. सध्या बाजरीला सरासरी २ हजार ४०० ते २ हजार ९०० रुपयांचा भाव मिळत आहे. बाजारीची आवक खरिपातील माल येईपर्यंत आणखी कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे दरातही काहीशी वाढ अपेक्षित आहे, असा अंदाज बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.
टोमॅटोचा बाजार नरमला
टोमॅटोच्या भावावरील दबाव आजही कायम होता. बाजारातील टोमॅटोची आवक वाढल्याचा परिणाम दरावर दिसून येत आहे. त्यामुळे टोमॅटोच्या भावावर दबाव आला. राज्यातील सर्वच भागात टोमॅटोची आवक वाढत आहे. त्यामुळे टोमॅटोला सरासरी १६०० ते २४०० रुपयांच्या दरम्यान भव मिळत आहे. टोमॅटोची बाजारातील आवक पुढील एक-दोन आठवड्यात पुन्हा वाढण्याचा अंदाज आहे, असे बाजारातील व्यापारी सांगत आहेत.