टीमच्या मालकाचा विश्वास जिंकता येत नसेल, तर असे कोट्यवधी रुपये कमावण्याचा काय फायदा? असच केएल राहुलच्या बाबतीत म्हणावं लागेल. आम्ही हे काय म्हणतोय? असा तुम्ही विचार करत असाल. यामागे कारण आहे, IPL 2025 साठी होणारं रिटेंशन. बातमी अशी आहे की, केएल राहुलने कोलकात्याला जाऊन लखनऊ सुपर जायंट्स टीमचे मालक संजीव गोयनका यांची त्यांच्या हेड ऑफीसमध्ये भेट घेतली. या भेटीमागचा अर्थ शोधताना आता असं लक्षात येतय की, केएल राहुलने कोट्यवधी रुपये कमावले पण तो विश्वास जिंकू शकला नाही.
केएल राहुल आणि संजीव गोयनका यांच्या भेटीमध्ये असं काय घडलं?. IPL गवर्निंग काऊन्सिलच्या एका सदस्याने नाव गोपनीय ठेवण्याच्या अटीवर PTI ला एक महत्त्वाची माहिती दिली. कोलकाता येथे RPG च्या हेड ऑफिसमध्ये ही भेट झाली. पुढच्या म्हणजे आयपीएल 2025 च्या सीजनसाठी रिटेन करावं अशी इच्छा केएल राहुलने व्यक्त केली. पण LSG चे मालक संजीव गोयनका यासाठी फार इंटरेस्टेड दिसत नाहीयत.
IPL शी संबंधित सूत्राने पुढे सांगितलं की, LSG ला माहितीय की, त्यांच्या पर्समध्ये किती रुपये आहेत. त्यांना किती खेळाडू रिटेन करायचे आहेत. पण कुठल्याही खेळाडूला रिटेंशनसाठी शब्द देण्याचा त्यांचा इरादा नाहीय. LSG मॅनजमेंटच्या वतीने या बद्दल अजून कोणीही कमेंट केलेली नाही.
तीन सीजनमध्ये राहुलने LSG कडून किती कमावले?
केएल राहुल मागच्या तीन सीजनपासून लखनऊ सुपर जायंट्सच नेतृत्व करतोय. प्रत्येक सीजनसाठी त्याला फ्रेंचायजीकडून 17 कोटी रुपये मिळतात. 3 सीजनमध्ये राहुलने फ्रेंचायजीकडून 51 कोटी रुपये कमावले आहेत. पण मालकाचा आता राहुलवर भरोसा राहिल्याच वाटत नाहीय.
स्पेशल डिनर ऑर्गेनाइज करण्याची वेळ आलेली
राहुल आणि गोयनका यांच्यामध्ये IPL 2024 मध्ये एक वाद झाला होता. ते सुद्धा एक कारण आहे. IPL 2024 मध्ये सनरायजर्स हैदराबादकडून LSG चा 10 विकेटने दारुण पराभव झाला होता. त्यावेळी संजीव गोयनका प्रचंड संतापले होते. मैदानातच केएल राहुल सोबतच्या त्यांच्या संवादाचे फोटो व्हायरल झाले होते. त्यावरुन संजीव गोयनका यांना सोशल मीडियावर ट्रोलही करण्यात आलं होतं. विषय इतका वाढला की, पुढे संजीव गोयनका यांना केएल राहुलसाठी स्पेशल डिनर ऑर्गेनाइज करावं लागलं. त्या डिनरचा परिणाम IPL 2025 च्या रिटेंशनवर होईल असं वाटत नाही.