Monday, July 7, 2025
Homeमहाराष्ट्रपुण्यात तरुणीचा निर्घृण खून, डोकं, हात-पाय धडापासून कापले

पुण्यात तरुणीचा निर्घृण खून, डोकं, हात-पाय धडापासून कापले

पुण्यात एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. खराडी भागात मुळा, मूठा नदी पात्रात एका तरुणीचा मृतदेह सापडला आहे. शिरच्छेद झालेल्या अवस्थेत हा मृतदेह आढळला. अत्यंत क्रूर पद्धतीने ही हत्या करण्यात आली. तरुणीच डोकं, हात-पाय धडापासून वेगळे करण्यात आले होते. मृत तरुणी 18 ते 20 वयोगटातील आहे. हत्येच कारण अद्याप अस्पष्ट आहे. पोलिसांनी अज्ज्ञात आरोपीविरोधात गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे.

 

अत्यंत अमानुष पद्धतीने या तरुणीची हत्या करण्यात आली आहे. मृतदेहाचे तुकडे नदी पात्रात फेकण्यात आले होते. हात, पाय आणि डोकं नसलेल्या अवस्थेत धड पोलिसांना नदीपात्रात मिळालं. मृत तरुणीची ओळख पटलेली नाही. चंदननगर पोलीस ठाण्यात या प्रकरणी अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

 

धारदार शस्त्राच्या सहाय्याने अवयव कापले

 

आरोपीने हा गुन्हा करताना क्रौर्याचा कळस गाठला. अत्यंत क्रूर पद्धतीने हत्या केली. मृत तरुणीची कोणालाही ओळख पटवता येऊ नये यासाठी आरोपीने धडापासून हात-पाय आणि मुंडकं वेगळं केलं. धारदार शस्त्राच्या सहाय्याने त्याने हे अवयव कापले व धड नदीपात्रात फेकून दिलं.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -