Tuesday, September 16, 2025
Homeब्रेकिंगलालपरीचा ब्रेक: एक हजार कामगारांचा संप, पाचशे फेर्‍या रद्द; रोज २२ लाखांचे...

लालपरीचा ब्रेक: एक हजार कामगारांचा संप, पाचशे फेर्‍या रद्द; रोज २२ लाखांचे नुकसान

महाराष्ट्र राज्य परिवहन (Transportation)महामंडळाच्या एक हजाराहून अधिक कामगारांनी विविध प्रलंबित मागण्यांसाठी बेमुदत संप पुकारल्याने राज्यभरात एसटी बसेसच्या फेर्‍यांवर परिणाम झाला आहे. या संपामुळे पाचशेहून अधिक फेर्‍या रद्द करण्यात आल्या असून, परिणामी महामंडळाला दररोज २२ लाख रुपयांचे नुकसान होत आहे.

 

संपामुळे अनेक जिल्ह्यांतील एसटी डेपो रिकामे पडले असून, प्रवाशांना प्रवासासाठी पर्यायी मार्ग शोधावे लागत आहेत. काही प्रवासी खाजगी वाहतुकीचा आधार घेत आहेत, तर काहींना रेल्वेची मदत घ्यावी लागत आहे. बसस्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी पाहायला मिळत असून, त्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे.

 

 

एसटी कामगार संघटनांनी संपाचा निर्णय घेतला असला तरी, राज्य सरकारने यावर तोडगा काढण्यासाठी चर्चा करण्याची तयारी दर्शवली आहे. मंत्र्यांची एक बैठक कामगार संघटनांच्या प्रतिनिधींसोबत आयोजित करण्यात आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, सरकार कामगारांच्या काही मागण्या मान्य करण्याच्या तयारीत आहे. तथापि, अद्याप कोणताही ठोस निर्णय झालेला नाही.

 

 

कामगारांनी सरकारकडून त्यांचे सर्व मागण्या मान्य होईपर्यंत संप सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. संपामुळे राज्यातील सार्वजनिक वाहतुकीवर मोठा परिणाम झाला असून, सर्वसामान्य प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

 

 

सरकारकडून संप मिटवण्यासाठी चर्चा सुरू असली तरी, या चर्चांचा काय निकाल लागतो आणि लालपरी पुन्हा रस्त्यावर केव्हा धावते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -