भारतातील प्रत्येक नागरिकांसाठी आधार कार्ड हे एक अत्यंत महत्त्वाचे असे ओळखपत्र आहे. ओळखपत्राची गरज आपल्याला अनेक ठिकाणी लागते. कोणतेही काम करायचे असेल ते शासकीय असो किंवा वैयक्तिक असो. त्यासाठी आधार कार्ड खूप गरजेचे असते. अगदी एसटीमध्ये आपल्याला पास काढायचा असेल, तरी आपले आधार कार्ड दाखवणे अनिवार्य आहे. भारतातील अनेक सरकारी योजनांचा तुम्हाला लाभ घ्यायचा असेल, तर आधार कार्ड क्रमांक खूप गरजेचे असते. आधार कार्डचे अनेक प्रकार आहेत. आधार लेटर, आधार पीव्हीसी कार्ड इ ई आधार, एम आधार कार्ड हे चार प्रकार आहेत. आता या चार कार्ड पैकी तुम्ही कोणते कार्ड वापरू शकता हे आपण जाणून घेणार आहोत.
सध्या भारतामध्ये आधार पीव्हीसी (Aadhaar PVC Card) हे एटीएम कार्ड सारखे आधार कार्ड मिळते. याची खासियत म्हणजे पाणी पडले तरी हे आधार कार्ड खराब होत नाही. पीव्हीसी आधार कार्ड काढण्यासाठी ऑनलाईन सुविधा आहे. तुम्ही ऑनलाईन पद्धतीने हे पीव्हीसी आधार कार्ड काही शुल्क देऊन डाऊनलोड देखील करू शकता. आता हे आधार कार्ड नक्की कसे काढायचे, हे आपण जाणून घेणार आहोत.
आधार पीव्हीसी कार्ड कसे काढायचे? | Aadhaar PVC Card
या आधार पीव्हीसी कार्डची काही प्रमुख वैशिष्ट्य आहेत. या कार्डवर टेम्परप्रूफ क्यूआर कोड असतो. त्याचप्रमाणे होलोग्रम, मायक्रोटेक, घोस्ट इमेज, आधार कार्ड इत्यादी असतात. तसेच छापलेली तारीख, आधार कार्डचा एम बोर्ड लोगो यासारख्या गोष्टी असतात. हे कार्ड तुम्हाला काढायचे असेल, तर स्पीड पोस्ट चार्जेससह तुम्हाला यासाठी 50 रुपये शुल्क द्यावे लागते.
तुम्हाला जर आधार पीव्हीसी कार्ड काढायचे असेल, तर तुम्ही माय आधारच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकता. तिथे गेल्यावर तुम्ही आवश्यक ती सगळी माहिती अर्जामध्ये भरा. त्यानंतर तुमचा आधार कार्ड क्रमांक आणि आधार नोंदणी क्रमांक दूधवाला लागेल. त्यानंतर आधार कार्डला जो तुमचा फोन नंबर रजिस्टर आहे. त्यावर एक ओटीपी येईल तो ओटीपी तुम्हाला तिथे एंटर करायचा आहे. आणि त्यानंतर तुम्हाला 50 रुपये शुल्क भरायचे आहे. अशा प्रकारे तुम्हाला पीव्हीसी आधार कार्ड मागवता येईल. या आधार पीव्हीसी कार्डसाठी तुम्हाला क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड, नेट बँकिंग, यूपीआय त्याचप्रमाणे पेटीएम द्वारे देखील शुल्क भरता येणार आहे. तुम्ही अर्ज दाखल केल्यानंतर केवळ 5 दिवसात असून स्पीड पोस्टाने तुमचे आधार कार्ड तुमच्या घरी येईल.
आधार कार्ड अपडेट करणे | Aadhaar PVC Card
त्याचप्रमाणे UIDAI यांनी आधार कार्ड अपडेट संदर्भात काही माहिती दिलेली आहे. त्यांनी सांगितलेल्या माहितीवरील ज्या लोकांच्या आधार कार्ड दहा वर्षापेक्षा जुने झालेले आहे. त्यांना बायोमेट्रिक अपडेट करायला सांगितलेले आहे. हे काम तुम्हाला अगदी फ्रीमध्ये करता येणार आहे. यासाठी 14 सप्टेंबर ही शेवटची तारीख आहे. त्यामुळे तुम्हाला तुमच्या आधार कार्डमध्ये जर काही दुरुस्ती किंवा बदल करायचा असल्यास तुम्ही 14 सप्टेंबर आधीच करा. तसेच ते केल्यानंतर तुम्ही पीव्हीसी कार्ड साठी अर्ज करा.