Monday, August 4, 2025
Homeब्रेकिंगकेंद्र सरकार प्रत्येक कुटुंबाला दर महिन्याला देणार ३,५०० रुपये? नेमकं सत्य काय?

केंद्र सरकार प्रत्येक कुटुंबाला दर महिन्याला देणार ३,५०० रुपये? नेमकं सत्य काय?

सध्या असाच एक युट्यूब व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यात केंद्र सरकार गरीब कुटुंबाला दर महिन्याला ३५०० रुपये दिले जाणार आहे, असा दावा केला जात आहे.

 

या युट्यूब चॅनेलवरुन तुम्हाला दर महिन्याला पैसे त्याचसोबत ५० किलो धान्य मोफत देणार असल्याचे सांगण्यात येत आहे. परंतु हा दावा खोटा आहे. अशी कोणत्याही प्रकारची योजना किंवा माहिती सरकारकडून देण्यात आलेली नाही.

 

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओनुसार, प्रत्येक गरीब कुटुंबातील व्यक्तीला सरकारकडून पैसे दिले जाणार आहे. त्याचसोबत १० टक्के गॅरंटी लागू होणार आहे. मात्र, ही माहिती पूर्णपणे चुकीची आहे. केंद्र सरकारने अशी कोणतीही घोषणा केलेली नाही.

 

या व्हिडिओबाबत पीआयबीने फॅक्ट चेक केले आहे. त्यानुसार, सरकारकडून अशी कोणतीही योजना किंवा माहिती देण्यात आलेली नाही. असा कोणत्याही प्रकारचा मजकूर शेअर करु नका, असंही पीआयबीद्वारे सांगण्यात आले आहे. अशा अनेक युट्यूब चॅनलवरुन खोटी माहिती शेअर केली जात आहे.त्यामुळे अशा कोणत्याबी लिंकवर क्लिक करु नका, असं सांगण्यात आले आहे.

सोशल मीडियावर नेहमी असे वेगवेगळे व्हिडिओ व्हायरल होत असतात. या व्हिडिओद्वारे खोटी माहिती पसरवली जाते. सरकारी योजनांच्या नावाखाली अनेक लोकांची फसवणूक केली जाते. अनेकदा सरकारच्या या योजनेतून पैसे मिळणार त्यासाठी रजिस्ट्रेशन करावे लागेल, पैसे भरावे लागतील असं सांगून पैसे आणि तुमची माहिती मिळवली जाते. तुमची माहितीचा अनेक लोक गैरवापर करु शकतात. त्यामुळे अशा कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू  नये.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -