Saturday, September 21, 2024
Homeब्रेकिंगPAN कार्डासाठी ऑनलाइन अर्ज कसा कराल? अवघ्या काही दिवसांत घरपोच मिळेल

PAN कार्डासाठी ऑनलाइन अर्ज कसा कराल? अवघ्या काही दिवसांत घरपोच मिळेल

बँक खातं उघडणं, आपला इन्कम टॅक्स रिटर्न भरणं, गुंतवणूक करणं, कर्ज किंवा क्रेडिट कार्ड घेणं किंवा कोणत्याही प्रकारच्या आर्थिक कामांसाठी याचा वापर केला जातो. जर तुम्हालाही तुमचं पॅनकार्ड बनवायचं असेल तर तुम्ही ऑनलाईन ही अर्ज करू शकता. होय, हे अगदी सोपं आहे.

 

ऑनलाईन अर्ज कसा करावा?

 

एनएसडीएल पोर्टल किंवा यूटीआयआयटीएसएल पोर्टलद्वारे पॅन कार्डसाठी ऑनलाइन अर्ज करता येतो. खालील ऑनलाइन स्टेप्स फॉलो करून तुम्ही तुमचं पॅनकार्ड घरी मिळवू शकता.

 

पॅन कार्डसाठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी NSDL किंवा UTIITSLला भेट द्या.

New PAN पर्याय निवडा.

पॅन कार्ड फॉर्म 49A निवडा, जो व्यक्तींसाठी निवडला जावा, मग ते भारतीय नागरिक असोत, एनआरई / एनआरआय किंवा ओसीआय व्यक्ती असोत.

हा फॉर्म त्या व्यक्तीच्या तपशीलासह भरावा.

फॉर्म सबमिट केल्यानंतर अर्जदाराला प्रोसेसिंग फी ऑनलाइन किंवा डिमांड ड्राफ्टद्वारे भरावी लागेल. यानंतर फॉर्मची प्रोसेस सुरू केली जाईल.

शुल्क भरल्यानंतर आणि पॅन फॉर्म 49A सबमिट केल्यानंतर एक रिसीट तयार होते, ज्यात १५ अंकी रिसीट क्रमांक असतो.

आपण आधार OTP ऑथेंटिकेशनचा वापर करून अर्जावर ई-स्वाक्षरी करू शकता किंवा आवश्यक कागदपत्रांसह फॉर्म 49A अर्ज ऑनलाइन सबमिट केल्यानंतर १५ दिवसांच्या आत कुरिअरद्वारे NSDL पॅन कार्यालय किंवा UTIITSL कार्यालयात पाठवू शकता.

रिसीट नंबर संबंधित कार्यालयात कुरिअर केल्यानंतर पॅन क्रमांकाची पडताळणी केली जाते आणि एनएसडीएल/यूटीआयटीएसएल पॅन पडताळणीनंतर कार्ड तयार केलं जातं.

फॉर्ममध्ये नमूद केलेल्या ग्राहकाच्या पत्त्यावर फिजिकल पॅन कार्ड १५ दिवसांच्याआत पाठवलं जातं.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -