Wednesday, October 16, 2024
Homeमहाराष्ट्र‘या’ लाडक्या बहिणींना दिवाळीआधी मिळणार बोनस; खात्यात येणार 5500 रुपये

‘या’ लाडक्या बहिणींना दिवाळीआधी मिळणार बोनस; खात्यात येणार 5500 रुपये

आगामी विधानसभा निवडणुकीचा विचार करून सरकारमार्फत राज्यातील नागरिकांसाठी विविध योजना राबवल्या जात असतात. याचा फायदा राज्यातील अनेक नागरिकांना होत आहे. या आगामी निवडणुकीत महिलांना केंद्रस्थानी ठेवून सरकारकडून महिलांसाठी योजना राबवल्या जात आहेत. यातीलच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. (Mukhyamantri Ladaki Bahin Yojana) या योजनेची सर्वत्र चर्चा आहे. राज्य सरकारने जुलै महिन्यामध्ये या योजनेची घोषणा केलेली होती. या योजनेअंतर्गत पात्र असणाऱ्या महिलांना दर महिन्याला दीड हजार रुपयांची आर्थिक मदत केली जात आहे.

 

महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी आणि सक्षमीकरणासाठी सरकारने ही योजना सुरू केलेली आहे. आतापर्यंत या योजनेचे तीन हप्ते महिलांच्या खात्यात जमा झालेले आहेत. तसेच दिवाळीला ऍडव्हान्समध्ये दोन महिन्याचे 3 हजार रुपये मिळणार आहे. तसेच याशिवाय काही महिलांना अतिरिक्त 2500 हजार रुपये देखील दिले जाणार आहे. आता या दिवाळी बोनस बद्दल आपण जाणून घेऊया.

 

आपल्या राज्यामध्ये महिलांचे आरोग्य पोषण आणि आर्थिक स्वावलंबन वाढण्यासाठी तसेच आर्थिक स्वातंत्र्य मिळण्यासाठी सरकारने ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना (Mukhyamantri Ladaki Bahin Yojana) सुरू केलेली आहे. या आधीच महिलांना तीन हप्ते मिळालेले आहेत. परंतु या योजनेअंतर्गत पात्र असणाऱ्या महिलांना दिवाळीसाठी एक खास गिफ्ट देण्याची देखील घोषणा सरकारने केलेली आहे. सरकारने ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे 3 हजार रुपये महिलांच्या खात्यात दिवाळी आधीच जमा केलेले आहे. परंतु काही महिलांना 2500 हजार रुपयांचे अतिरिक्त रक्कम देखील दिली जाणार आहे. म्हणजेच दिवाळी आदी महिलांना 5500 हजार रुपयांचा लाभ मिळणार आहे. परंतु आता कोणाला मिळणार आहे? त्याच्या अटी काय आहेत? हे आपण जाणून घेऊया.या अतिरिक्त बोनसचा फायदा घेण्यासाठी महिलेचे नाव हे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी यादीत असणे गरजेचे आहे. या योजनेच्या माध्यमातून कमीत कमी तीन महिन्यांचा लाभ घेतलेला असला पाहिजे. त्याचप्रमाणे महिलांचे आधार कार्ड आणि बँक खाते एकमेकांना लिंक असणे गरजेचे आहे.

 

 

अर्ज कसा करावा ? | Mukhyamantri Ladaki Bahin Yojana

या योजनेचा अर्ज करण्यासाठी सरकारने अनेक वेळा मुदतवाढ केलेली आहे. आता शेवटची मुदतवाढ 15 ऑक्टोबरपर्यंत सरकारने शेवटची मुदतवाढ केलेली आहे. परंतु यावेळी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार नाही. तुम्ही ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकता. यासाठी तुम्हाला या योजनेच्या अर्जाचा झेरॉक्स मारून घ्यायचे आहे. तसेच तो अर्ज भरून त्याला लागणारी आवश्यक कागदपत्र जोडायची आहेत. त्यानंतर तुम्हाला हा अर्ज तुमच्याजवळील ग्रामपंचायत अंगणवाडी केंद्र किंवा महिला आणि बालकल्याण विभागाच्या ठिकाणावर जाऊन अर्ज सादर करायचा आहे. त्यानंतर काही दिवसांनी तुम्ही कार्यालयात जाऊन तुमच्या अर्जाची पावती घेऊ शकता.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -