मागच्या अनेक दिवसांपासून पेन्शन धारक पेन्शन वाढीची मागणी करत आहेत. अशा पेन्शन धारकांना आता मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. कारण आता किमान पेन्शन मध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. मीडिया रिपोर्टनुसार किमान पेन्शन 9000 रुपये करण्यासाठी ब्लू प्रिंट तयार करण्यात आली आहे. त्यामुळे पेन्शन धारकांना दिलासा मिळणार आहे.
कोणाला मिळणार लाभ
महत्त्वाची बाब म्हणजे याचा लाभ सर्व सरकारी आणि गैरसरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. सरकारच्या या निर्णयाचा लाभ पेन्शन धारक आणि चालू खातेधारकांना मिळणार आहे.मिळालेल्या माहितीनुसार कामगार मंत्रालयाची एक महत्त्वपूर्ण बैठक होणार असून यामध्ये हा निर्णय मंजूर होणार असल्याचं निश्चित मानलं जात आहे.
महागाईच्या काळात पेन्शन पुरेशी नाही
खरंतर 1995 अंतर्गत अनेक पेन्शन धारकांसाठी दर महिन्याला केवळ एक हजार रुपये जगण्यासाठी सध्याच्या महागाई मध्ये पुरेसे नाहीत. मार्च 2021 मध्ये संसदेच्या स्थायी समितीने किमान पेन्शन एक हजार वरून तीन हजार रुपये करण्याची शिफारस केली होती. मात्र या महागाईच्या युगात ती अपुरी आहे. त्यामुळे 21000 रुपयांच्या मूळ वेतनानुसार पेन्शनची गणना केली जाईल असा दावा सूत्रांनी केला आहे. म्हणजेच जर आपण किमान पेन्शन बद्दल बोललो तर आता नऊ हजार रुपये मिळण्याची ब्लू प्रिंट तयार करण्यात आली आहे.
कामगार मंत्रालयाच्या बैठकीत किमान पेन्शन वाढीचा मुद्दा महत्त्वाचा ठरणार आहे. कारण पेन्शन धारक अनेक दिवसांपासून मागणी करत आहेत तीन हजार रुपये पेन्शन घेऊन जगायचे कसे? असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे पेन्शन वाढायला हवी याशिवाय नवीन वेतन संहिता लागू करण्याबाबत चर्चा होणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांच्या पगाराची रचना बदलू शकते. एवढेच नाही तर कामगार मंत्रालयाच्या बैठकीत किमान पेन्शनचा विचार करणं सर्वात महत्त्वाचा मुद्दा असल्याचा दावा सूत्रांनी केला आहे. कर्मचाऱ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे