Thursday, November 14, 2024
Homeकोल्हापूरकाेल्हापूर जिल्ह्यात मोठ्या घडामाेडी; राजू शेट्टींचा ठाकरे गटाच्या उमेदवाराला पाठिंबा

काेल्हापूर जिल्ह्यात मोठ्या घडामाेडी; राजू शेट्टींचा ठाकरे गटाच्या उमेदवाराला पाठिंबा

काेल्हापूर : तिसऱ्या आघाडीच्या माध्यमातनूत निवडणूक रिंगणात उतरलेले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी शाहुवाडी मतदारसंघातील शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार(candidate) सत्यजित पाटील यांनी पाठिंबा जाहीर केला. काेल्हापूर जिल्ह्यातील या घडामाेडींने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

 

महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत वेगवेगळी समीकरणे आकाराला येऊ लागली आहेत. कुठे मनसे अजित पवार यांच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा देतेय, तर कुठे भाजप मनसेच्या उमेदवाराला(candidate) पाठिंबा देतेय. कुठे काँग्रेसचा अधिकृत उमेदवार माघार घेतोय तर कुठे काँग्रेसला बदललेल्या उमेदवारालाच पाठिंबा द्यावा लागत आहे. कोल्हापूर पट्ट्यात राजकारण कसे फिरू लागले आहे. याचा प्रत्यय राज्याच्या राजकारण्यांना येऊ लागला आहे. राजू शेट्टी यांनी तर आश्चर्यकारक निर्णय घेतला आहे.

 

शेट्टी यांनी लोकसभेच्या आपल्या विरोधकालाच विधानसभेला पाठिंबा जाहीर करून टाकला आहे. ठाकरे गटाचे महािवकास आघाडीचे उमेदवार शाहुवाडी मतदारसंघातील उमेदवार सत्यजित पाटील यांनी शेट्टींची भेट घेतली. यावेळी शेट्टी यांनी आपल्याला पाठिंबा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली. पाटील हे जनसुराज्य पक्षाचे आमदार विनय कोरे यांच्याविरोधात निवडणूक लढवत आहेत. राजू शेट्टी आणि कोरे यांच्यातून विस्तवही जात नाही. यामुळे राजू शेट्टी यांनी पाटील यांना पाठिंबा दिला आहे.

 

राजू शेट्टी यांचा पाठिंबा मिळाल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटना आता या मतदारसंघापुरती महािवकास आघाडीच्या पाठीशी राहणार आहे. लोकसभेला शेट्टी यांनी महािवकास आघाडीकडून उमेदवारी मिळण्यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न केले होते.

 

परंतू, चर्चा फिस्कटल्याने ठाकरेंनी आपला उमेदवार जाहीर करून शेट्टी यांना वेगळे लढण्यासाठी भाग पाडले होते. हातकणंगलेच्या जागेवर शेट्टी यांनी ठाकरे गटाकडे पाठिंबा मागितला होता. मात्र, ठाकरे गटाकडून राजू शेट्टी यांना मशाल चिन्हावर निवडणूक लढण्याची विनंती केली होती. याला राजू शेट्टी यांनी नकार दिला होता.

 

तिसऱ्या आघाडीचा येत्या विधानसभा निवडणुकीवरील परिणाम या विषयावर बरीच साधकबाधक चर्चा सुरू आहे. कोल्हापूरचे संभाजीराजे, शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी व प्रहारचे बच्चू कडू हे तिसऱ्या आघाडीत आहेत.

 

राजू शेट्टींना लोकसभेच्या निडणुकीत हातकणंगलेतून स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे निवडणूक लढवायची होती आणि तिथे मविआत उबाठा सेनेचा दावा असल्यामुळे त्यांचा पाठिंबा हवा होता. पण शेट्टींनी मशाल चिन्हावरच निवडणूक लढवावी म्हणून उद्धव अडून बसले. या ठाकरेंच्या चुकीच्या निर्णयाने सीट तर शिंदेंसेनेला गेलीच, पण राजू शेट्टीही विरोधात गेले. आता शेट्टी यांनी ठाकरे गटाच्या उमेदवाराला पाठिंबा दिल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांणा उधाण आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -