नाश्ता हा दिवसातील सर्वात महत्वाचा आहार आहे. सकाळी उठल्यानंतर पोटभरून नाश्ता केल्याने आपल्याला काम करायला वेगळीच ताकद मिळते. अनेकदा सकाळच्या घाईमुळे लोकांना नाश्ता करता येत नाही. आजकालची मुले बाजारात मिळणारे पदार्थ खाण्यास प्राधान्य देतात. त्यांना घरी बनवलेले पदार्थ खायला दिल्यावर ते खूप नाटकं करतात. अशा परिस्थितीत प्रत्येक आईला आपल्या मुलाला काय खायला द्यायचे हा प्रश्न पडतो. तुम्हाला देखील मुलांना चटपटीत टेस्टी नाश्ता बनवून द्याचा असेल तर हा लेख उपयुक्त ठरू शकतो. येथे आम्ही तुमच्यासाठी एक अशी रेसिपी घेऊन आलो आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही अगदी
आपण नेहमी अनेक प्रकारचे सँडविच खात असतो. त्यातच तुम्ही तेच तेच सँडविच खाऊन कंटाळा आला असेल तर तुम्ही नाश्त्यामध्ये दही सँडविच खाऊ शकता. दही सँडविच बनवायला देखील खूप सोपा आहे. आणि खायला ही खूप चविष्ट आहे. अशावेळी चला जाणून घेऊया ब्रेकफास्टमध्ये झटकेपट टेस्टी दही सँडविच कसा बनवायचा.
दही सँडविच बनवण्यासाठी लागणारे साहित्य :
ब्रेड
३/४ कप दही
तुमच्या आवडीच्या बारीक चिरलेल्या भाज्या (गाजर, कोबी, शिमला मिरची, सोयाबीनचे, कांदे घेऊ शकता.)
बारीक चिरलेली कोथिंबीर
२ टेबलस्पून तूप
१/३ टीस्पून बारीक केलेली काळी मिरी
१/२ इंच किसलेला आल्याचा तुकडा
चवीनुसार मीठ
दही सँडविच कसे बनवायचे?
दही सँडविच बनवण्यासाठी सर्वप्रथम दही एका भांड्यात घेऊन छानपैकी फेटून घ्या. दही फेटल्यानंतर त्यात एक-एक करून तुमच्या आवडीच्या बारीक चिरलेल्या सर्व भाज्या घाला. यानंतर दह्यातीळ मिश्रणात मसाले म्हणजेच काळी मिरी आणि चवीनुसार मीठ घालावे. तसेच यात बारीक चिरलेली कोथिंबीर घाला. आता ब्रेडच्या एका स्लाईसवर तयार केलेले मिश्रण लावा आणि दुसरा ब्रेड वर ठेवा. एक तवा घ्या त्यावर तूप घालून तयार केले सँडविच ठेवून दोन्ही बाजूंनी भाजून घ्या. तुमचे दही सँडविच तयार होईल. गरम गरम दही सँडविच तुम्ही पुदिन्याची चटणी किंवा केचपसोबत खाऊ शकता.