विधानसभा निवडणूक कार्यक्रम घोषित झाल्यानंतर राज्यात चांदा ते बांदा अवैध मुद्देमाल जप्त करण्याचा धडाकाच सुरुच असून कोल्हापूर जिल्ह्यातही मोठी कारवाई करण्यात आली आहे. आतापर्यंत स्थिर सर्वेक्षण पथक (SST) राज्य पोलीस दल, राज्य उत्पादन शुक्ल विभाग, राज्य वस्तु व सेवा कर विभागाकडून या कारवाईमध्ये आतापर्यंत 10 कोटी 71 लाखांचा अवैद्य मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील 10 मतदारसंघापैंकी सर्वाधिक दारु जप्तीची कारवाई कोल्हापूर दक्षिण, करवीर, राधानगरी आणि चंदगड विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक दारु जप्त करण्यात आली आहे.
11 नोव्हेंबरपर्यंत मतदारसंघनिहाय केलेली धडक कारवाई
चंदगड विधानसभा मतदारसंघ
रोख रक्कम 2 लाख, अवैध मद्य – 7 हजार 76.48 लिटर, मद्याची किंमत 27 लाख 8 हजार रुपये, इतर अवैध मुद्देमाल 2 लाख 32 हजार असे एकूण 31 लाख 40 हजार.
राधानगरी विधानसभा मतदारसंघ
अवैध मद्य – 5 हजार 820.20 लिटर, मद्याची किंमत 16 लाख 41 हजार रुपये, इतर अवैध मुद्देमाल 42 हजार याप्रमाणे एकूण 16 लाख 83 हजार.
कागल विधानसभा मतदारसंघ
रोख रक्कम 36 हजार, अवैध मद्य – 3 हजार 25.3 लिटर, मद्याची किंमत 6 लाख 99 हजार रुपये, मौल्यवान धातू (सोने, चांदी) 10 लाख 93 हजार इतर अवैध मुद्देमाल 26 लाख 19 हजार याप्रमाणे एकूण 44 लाख 47 हजार
कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघ
रोख रक्कम 6 लाख 94 हजार, अवैध मद्य – 37 हजार 429 लिटर, मद्याची किंमत 39 लाख 77 हजार रुपये, अंमली पदार्थ 90 हजार, इतर अवैध मुद्देमाल 12 लाख 81 हजार याप्रमाणे एकूण 60 लाख 43 हजार.
करवीर विधानसभा मतदारसंघ
अवैध मद्य – 20 हजार 803.78 लिटर, मद्याची किंमत 18 लाख 51 हजार रुपये, इतर अवैध मुद्देमाल 19 लाख 97 हजार याप्रमाणे एकूण 38 लाख 48 हजार
कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघ
रोख रक्कम 15 लाख 62 हजार, अवैध मद्य – 1 हजार 267.05 लिटर, मद्याची किंमत 5 लाख 55 हजार रुपये, मौल्यवान धातू (सोने, चांदी) 5 कोटी 58 लाख 72 हजार, इतर अवैध मुद्देमाल 6 लाख 98 हजार याप्रमाणे एकूण 5 कोटी 86 लाख 87 हजार.
शाहूवाडी विधानसभा मतदारसंघ
अवैध मद्य – 2 हजार 274.81 लिटर, मद्याची किंमत 3 लाख 86 हजार रुपये, इतर अवैध मुद्देमाल 9 लाख 72 हजार याप्रमाणे एकूण 13 लाख 58 हजार
हातकणंगले विधानसभा मतदारसंघ
रोख रक्कम 1 लाख 34 हजार, अवैध मद्य – 17 हजार 156.15 लिटर, मद्याची किंमत 17 लाख 67 हजार रुपये, मौल्यवान धातू (सोने, चांदी) 2 कोटी 3 लाख 77 हजार, इतर अवैध मुद्देमाल 14 लाख 61 हजार याप्रमाणे एकूण 2 कोटी 37 लाख 39 हजार
इचलकरंजी विधानसभा मतदारसंघ
अवैध मद्य – 2 हजार 96.56 लिटर, मद्याची किंमत 3 लाख 62 हजार रुपये, इतर अवैध मुद्देमाल 6 लाख 93 हजार याप्रमाणे एकूण 10 लाख 55 हजार
शिरोळ विधानसभा मतदारसंघ
अवैध मद्य – 20 हजार 5.56 लिटर, मद्याची किंमत 11 लाख 16 हजार रुपये, इतर अवैध मुद्देमाल 19 लाख 88 हजार याप्रमाणे एकूण 31 लाख 3 हजार
असा एकूण रोख रक्कम 26 लाख 25 हजार, अवैध मद्य – 1 लाख 16 हजार 954.62 लिटर अवैध मद्याची किंमत 1 कोटी 50 लाख 62 हजार, अंमली पदार्थ 90 हजार, मौल्यवान धातू (सोने, चांदी इ.) 7 कोटी 73 लाख 42 हजार, इतर अवैध मुद्देमाल 1 कोटी 19 लाख 83 हजार असा एकूण 10 कोटी 71 लाख 3 हजार किंमतीचा मुद्देमाल विविध पथकांनी धडक कारवाईमध्ये जप्त केला आहे. अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. जिल्ह्यात 10 मतदार संघामध्ये स्थिर सर्वेक्षण पथकांची (SST) 44 स्थाने निश्चित करण्यात आली असून या ठिकाणी 128 स्थिर सर्वेक्षण पथकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तसेच 41 VST, 22VVT, 75 FST पथकांची निर्मिती करण्यात आली आहे. तसेच जिल्ह्यातील 8 तालुक्यात 15 जिल्हा व आंतरराज्य तपासणी नाके (चेकपोस्ट) उभारण्यात आले आहेत.