ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यातील पहिल्या दिवसाचा (6 डिसेंबर) खेळ संपला. ऑस्ट्रेलियाने मिचेल स्टार्क याने घेतलेल्या 6 विकेट्सच्या जोरावर टीम इंडियाला 180 धावांवर गुंडाळलं. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने दिवसाचा खेळ संपेर्यंत 1 विकेट गमावून 86 धावा केल्या आहेत. त्यामुळे ऑस्ट्रेलिया अद्याप 94 धावांनी पिछाडीवर आहे. जसप्रीत बुमराह याचा अपवाद टीम इंडियाकडून एकाही गोलंदाजाला विकेट घेता आली नाही. ऑस्ट्रेलियाच्या बॅटिंगदरम्यान टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मियाँ भाई मोहम्मद सिराज याला संताप अनावर झाला. संतापलेल्या सिराजने रागाच्या भरात बॉलिंगदरम्यान ऑस्ट्रेलियाचा फलंदाज मार्नस लबुशेन याच्या दिशेने बॉल फेकून मारला. नक्की काय झालं? सविस्तर जाणून घेऊयात.
सिराज संतापला आणि बॉल फेकून मारला
मोहम्मद सिराज ऑस्ट्रेलियाच्या डावातील 25 वी ओव्हर टाकत होता. लबुशनने सिराजला या ओव्हरमधील सहाव्या बॉलवर रोखलं. सिराज रनअप घेऊन जवळजवळ अंपायरपर्यंत धावत आला होता. मात्र लबुशेनने हात दाखवत सिराजला थांबण्याचा इशारा केला. लबुशेनला साईट स्क्रीनवर एक क्रिकेट चाहता बिअर ग्लास घेऊन जाताना दिसला. ज्यामुळे लबुशेनचं लक्ष विचलित झालं. त्यामुळ लबुशेनने सिराजला थांबण्याचा इशारा केला. मात्र सिराजला हे काही पटलं नाही. त्यामुळे संतापलेल्या सिराजने लबुशेनच्या दिशेने बॉल फेकला. लबुशेनला सुदैवाने बॉल लागला नाही.
सिराज इतक्यावरच थांबला नाही. सिराजने बॉल फेकल्यानंतर लबुशेनला डिवचण्याचा प्रयत्न केला. मात्र सिराज लबुशेनला काय म्हणाला? हे अद्याप स्पष्ट होऊ शकला नाही. सिराजच्या या सर्व कृतीचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
सिराजला संतापला बॉल फेकून मारला
ऑस्ट्रेलिया प्लेइंग इलेव्हन : पॅट कमिन्स (कॅप्टन), उस्मान ख्वाजा, नॅथन मॅकस्वीनी, मार्नस लॅबुशेन, स्टीव्हन स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, ॲलेक्स कॅरी (विकेटकीपर), मिचेल स्टार्क, नॅथन लियॉन आणि स्कॉट बोलँड.
टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन : रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, केएल राहुल, शुबमन गिल, विराट कोहली, ऋषभ पंत, नितीश रेड्डी, रवीचंद्रन अश्विन, हर्षित राणा, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.