Thursday, December 12, 2024
Homeमनोरंजन'पुष्पा' अन् 'श्रीवल्ली'नं चित्रपटासाठी किती घेतलं मानधन? आकडा ऐकून डोळे फिरतील

‘पुष्पा’ अन् ‘श्रीवल्ली’नं चित्रपटासाठी किती घेतलं मानधन? आकडा ऐकून डोळे फिरतील

‘पुष्पा 2: द रुल’ (Pushpa 2) सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. मीडिया रिपोर्टनुसार, ‘पुष्पा 2’ चित्रपटाने चार दिवसात 529.45 कोटी रुपये कमावले आहे. ‘पुष्पा 2’ने ॲडव्हान्स बुकिंगमध्ये करोडोची कमाई केली होती.या चित्रपटाची केझ दिवसेंदिवस वाढतच जात आहे.

 

द रुल’ चित्रपटात तगडी स्टारकास्ट पाहायला मिळ आहे. हा चित्रपट सुकुमार दिग्दर्शित आहेत. ‘पुष्पा 2’ पाच भाषांमध्ये प्रदर्शित झाला आहे. यात तेलुगू, तमिळ, हिंदी, मल्याळम आणि कन्नड या भाषांचा समावेश आहे. या सुपरहिट चित्रपटासाठी कलाकारांनी किती रुपयांचे मानधन घेतले जाणून घेऊयात.

 

अल्लू अर्जुन

 

‘पुष्पा 2’ चित्रपटात साऊथ अभिनेता अल्लू अर्जुन (Allu Arjun) मुख्य भूमिकेत आहे. त्याचा मोठा चाहता वर्ग आहे. ‘पुष्पा’ ही भूमिका प्रेक्षकांच्या भरपूर पसंतीस पडली आहे. अल्लू अर्जुनने ‘पुष्पा 2’साठी तब्बल 300 कोटी रुपये मानधन घेतले आहे. चित्रपटासाठी सर्वात जास्त मानधन अल्लू अर्जुनचे आहे

 

रश्मिका मंदाना

 

‘पुष्पा 2’ चित्रपटात साऊथ अभिनेत्री रश्मिका मंदानाने (Rashmika Mandanna ) श्रीवल्लीची भूमिका साकारली आहे. तिचा चित्रपटातील अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ घातली आहे. तसेच रश्मिका आणि अल्लू अर्जुनची केमिस्ट्री चाहत्यांना खूप जास्त आवडली. ‘पुष्पा 2’ चित्रपटासाठी रश्मिका मंदानाने 10 कोटी रुपये मानधन घेतले आहे.

 

श्रीलीला

 

‘पुष्पा 2’ चित्रपटात श्रीलीलाने आयटम साँग केले आहे. ‘किसिक’ आयटम साँगमध्ये श्रीलीला आणि अल्लू अर्जुन अनोखा अंदाज पाहायला मिळाला आहे. श्रीलीलाने ‘किसिक’ या आयटम साँगसाठी 2 कोटी रुपये मानधन घेतले आहे.

 

फहाद फासिल

 

‘पुष्पा 2’ चित्रपटातील फहाद फॉसिलच्या भूमिकेने प्रेक्षकांची मने जिंकली. याने चित्रपटासाठी 8 कोटी रुपयांचे मानधन घेतले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -