Thursday, December 12, 2024
Homeमहाराष्ट्रग्राहकांच्या चेहऱ्यावर चिंता, आज पुन्हा वधारले सोन्याचे दर; वाचा 24 कॅरेटचे दर

ग्राहकांच्या चेहऱ्यावर चिंता, आज पुन्हा वधारले सोन्याचे दर; वाचा 24 कॅरेटचे दर

तर, चांदी 321 रुपयांनी घसरुन 92,127 रुपये प्रति किलोग्रॅमवर स्थिरावली आहे. मागील सत्रात चांदी 92,448 रुपयांवर स्थिरावली होती. आंतरराष्ट्रीय बाजारातदेखील आज बुलियन्समध्ये सुस्ती दिसत आहे.

 

शुक्रवारीदेखील सोन्याच्या दरात नरमाई दिसून येत होती. तर, आज सोमवारीदेखील सोनं किचिंत वधारलं आहे. आज 24 कॅरेट सोनं 160 रुपयांनी वधारलं आहे. 77,780 रुपये प्रतितोळ्यावर सोनं स्थिरावलं आहे. ऐन लग्नसराईत सोनं वधारल्याने ग्राहकांच्या चिंतेत वाढ झाली आहे. आता मे महिन्यापर्यंत लग्न समारंभ असल्याने सोन्याची मागणी जास्त असणार आहे.

 

आज 22 कॅरेट सोन्याच्या दरात 150 रुपयांची वाढ झाली असून प्रतितोळा सोनं 71,300 रुपयांवर पोहोचलं आहे. तर, 24 कॅरेट सोन्याच्या दरात 160 रुपयांची वाढ झाली असून 77,780 रुपयांवर स्थिरावलं आहे. 18 कॅरेट सोन्याचे दर 58,340 रुपयांवर पोहोचलं असून 120 रुपयांची वाढ झाली आहे.

 

आज काय आहेत सोन्याचे भाव?

 

ग्रॅम सोनं किंमत

10 ग्रॅम 22 कॅरेट 71, 300 रुपये

10 ग्रॅम 24 कॅरेट 77, 780 रुपये

10 ग्रॅम 18 कॅरेट 58, 340 रुपये

 

ग्रॅम सोनं किंमत

1 ग्रॅम 22 कॅरेट 7,130 रुपये

1 ग्रॅम 24 कॅरेट 7,778 रुपये

1 ग्रॅम 18 कॅरेट 5, 834 रुपये

 

ग्रॅम सोनं किंमत

8 ग्रॅम 22 कॅरेट 57,040 रुपये

8 ग्रॅम 24 कॅरेट 62, 224 रुपये

8 ग्रॅम 18 कॅरेट 46,672 रुपये

 

मुंबई – पुण्यात कसे असतील सोन्याचे दर?

 

22 कॅरेट-71, 300 रुपये

24 कॅरेट- 77, 780 रुपये

18 कॅरेट- 58, 340 रुपये

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -