Tuesday, February 4, 2025
Homeमहाराष्ट्रफेब्रुवारी महिन्यात तब्बल 14 दिवस बँका बंद ; पहा सुट्ट्यांची यादी

फेब्रुवारी महिन्यात तब्बल 14 दिवस बँका बंद ; पहा सुट्ट्यांची यादी

,फेब्रुवारी 2025 महिन्यात बँकांच्या सुट्ट्यांचे शेड्यूल जाहीर करण्यात आले आहे. यामध्ये बँकांनाही काही विशिष्ट दिवशी सुट्टी असणार आहे, ज्यामुळे विविध राज्यांतील नागरिकांना त्या दिवशी बँकिंग सेवांचा वापर करता येणार नाही. मात्र, नेट बँकिंग, मोबाईल बँकिंग आणि एटीएमसारख्या सुविधा सुरु असणार आहेत. या महिन्यात एकूण 28 दिवसांपैकी 14 दिवस बँकांना सुट्टी असणार आहे , पण प्रत्येक राज्यातील परिस्थिती आणि सण-उत्सवांच्या आधारावर काही ठिकाणी यामध्ये बदल होईल. राज्य सरकारांच्या आदेशानुसार, स्थानिक सणांवर आधारित विविध शहरांमध्ये आणि जिल्ह्यात बँका बंद होऊ शकतात. तर चला या सुट्ट्यांची यादी पाहुयात.

 

फेब्रुवारीमध्ये 14 दिवस बँका बंद (Bank Holidays List) –

2 फेब्रुवारी –

 

फेब्रुवारी महिन्याचा दुसरा रविवार असल्यामुळे बँकांना सुट्टी असेल. बँकिंग कामकाज थांबलेले असेल, परंतु एटीएम, नेट बँकिंग आणि मोबाईल अँप्स बँकिंग सेवा चालू राहतील.

 

3 फेब्रुवारी (सरस्वती पूजा) –

 

खासगी किंवा प्रादेशिक सणांच्या कारणाने अगरतळा येथील बँका बंद असतील.

 

 

8 आणि 9 फेब्रुवारी –

 

8 फेब्रुवारी शनिवार आणि 9 फेब्रुवारी रविवार असल्यामुळे बँकांना साप्ताहिक सुट्टी असेल.

 

11 फेब्रुवारी (थाई पूसामम) –

 

थाई पूसाममच्या निमित्ताने चेन्नई शहरातील बँकांना सुट्टी असेल.

 

12 फेब्रुवारी (श्री रविदास जयंती) –

 

या दिवशी शिमला येथे बँका बंद असतील.

 

15 फेब्रुवारी (शनिवार) –

 

लुई-नगाई-नीच्या निमित्ताने इम्फाळमध्ये बँका बंद असतील.

 

16 फेब्रुवारी (रविवार) –

 

फेब्रुवारी महिन्याचा तिसरा रविवार असल्यामुळे बँकांना सुट्टी असेल.

 

19 फेब्रुवारी (छत्रपती शिवाजी महाराज जयंती) –

 

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त बेलापूर, मुंबई, नागपूर येथे बँकांची सुट्टी असेल.

 

20 फेब्रुवारी (स्टेटहुड डे) –

 

इटानगर येथील बँकांना स्टेटहुड डेच्या निमित्ताने सुट्टी असेल

 

22 आणि 23 फेब्रुवारी (Bank Holidays List) –

 

यावेळी शनिवार आणि रविवारच्या कारणामुळे बँकांना सुट्टी असेल.

 

26 फेब्रुवारी (महाशिवरात्री) –

 

महाशिवरात्रीच्या सणानिमित्त अहमदाबाद, बंगळुरू, बेलापूर, भोपाळ, भुवनेश्वर, चंडीगढ़, देहरादून, हैदराबाद (आंध्र प्रदेश आणि तेलंगाना), जयपूर, जम्मू, कानपूर, कोच्ची, लखनौ, मुंबई, नागपूर, रायपूर, रांची, शिमला, श्रीनगर, तिरुअनंतपुरम येथे बँका बंद असतील.

 

28 फेब्रुवारी (गंगटोक) –

 

गंगटोक येथे या दिवशी बँकांना सुट्टी असेल.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -