Saturday, February 22, 2025
Homeमहाराष्ट्रUPI पेमेंट करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! नियमात मोठा बदल, ग्राहकांना नेमका काय होणार...

UPI पेमेंट करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! नियमात मोठा बदल, ग्राहकांना नेमका काय होणार फायदा?

युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस म्हणजेच UPI आपल्या आर्थिक जीवनाचा एक महत्त्वाचा भाग झाला आहे. UPI सुरु झाल्यापासून खिशात पाकीट ठेवणाऱ्या लोकांची संख्या कमी झाली आहे. कारण बहुतांश लोकांचे व्यवहार हे UPI द्वारेच होत आहेत. आता या डिजिटल पेमेंट (Digital Payments) सुविधेत आणखी सुधारणा करण्यासाठी, नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने काही महत्त्वाचे बदल केले आहेत.

 

 

काय आहे नेमकी प्रक्रिया?

जर एखाद्या व्यक्तीचा UPI व्यवहार अयशस्वी झाला आणि परतावा त्याच्या खात्यात जमा झाला नाही, तर त्याला त्याच्या बँकेकडून चार्जबॅकची विनंती करावी लागेल. या प्रक्रियेला पूर्वी विलंब लागत होता. आता मात्र, NPCI च्या नवीन नियमांनुसार, व्यवहार क्रेडिट पुष्टीकरण (TCC) किंवा रिटर्न रिक्वेस्ट (RET) च्या आधारे चार्जबॅक विनंती आपोआप स्वीकारल्या जातील किंवा नाकारल्या जातील, ज्यामुळं प्रक्रियेला गती मिळणार आहे.

 

TCC आणि RET प्रणालीचं काम काय?

TCC आणि RET प्रणाली UPI वापरकर्त्यांना माहिती देण्यास मदत करतात. व्यवहाराची रक्कम लाभार्थी बँकेपर्यंत पोहोचली आहे की नाही, अशा प्रकारे संवादक म्हणून काम करतात. पैसे आधीच लाभार्थी बँकेत पोहोचले असल्यास, व्यवहार यशस्वी मानला जातो आणि चार्जबॅक विनंतीची आवश्यकता नसते. मात्र, काही कारणास्तव पैसे लाभार्थी बँकेत जमा न झाल्यास, ते पैसे देणाऱ्या ग्राहकाला परत केले जातात. यापूर्वीही प्रक्रिया मॅन्युअली केली जात होती. ज्यात खूप वेळ लागत होता. आता ते स्वयंचलित असेल जेणेकरुन व्यवहारांशी संबंधित वाद लवकर सोडवता येतील.

 

15 फेब्रुवारीपासून नवीन नियम लागू

NPCI च्या परिपत्रकात दिलेल्या माहितीनुसार, UPI विवाद निराकरण प्रणाली (URCS) मध्ये स्वयंचलित स्वीकृती किंवा नकार 15 फेब्रुवारीपासून लागू झाला आहे. नवीन नियम फक्त बल्क अपलोड पर्याय आणि युनिफाइड डिस्प्यूट रिझोल्यूशन इंटरफेस (UDIR) वर लागू होतो. फ्रंट-एंड विवाद निराकरण नाही. ही प्रक्रिया स्वयंचलित करुन, लाभार्थी बँकांना चार्जबॅक अंतिम करण्यापूर्वी व्यवहार सोडवण्यासाठी पुरेसा वेळ मिळणार आहे..

 

ग्राहकांना काय होणार फायदा?

NPCI चा चार्जबॅक (परतावा प्रक्रिया) स्वयंचलित केल्याने ग्राहकांना जलद परतावा मिळण्यास मदत होईल. बँकांसाठी ही प्रक्रिया सुलभ होईल. याशिवाय, यामुळं फसवणूक आणि अनावश्यक वाद कमी होण्यास मदत होईल. तसेच संपूर्ण प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि जलद होईल. UPI व्यवहारांची संख्या सतत वाढत आहे. गेल्या वर्षी, जानेवारी ते नोव्हेंबर 2024 पर्यंत, युनिफाइड पेमेंट इंटरफेस (UPI) द्वारे एकूण 15,547 कोटी व्यवहार झाले होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -