महाराष्ट्र सरकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु केली आहे. विधानसभा निवडणुकीआधी ही योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेत दर महिन्याला १५०० रुपये दिले जातात. या योजनेत महिलांना २१०० रुपये देण्याचे आवाहन महायुती सरकारने केले होते.
परंतु आता हे पैसे कधी देणार याबाबत कोणतीही माहिती समोर आली नाही.
महायुती सरकार लवकरच महिलांना २१०० रुपये दिले जातात.या योजनेत विधानसभा निवडणुका होऊन ४ महिने झाले आहेत. परंतु अद्याप २१०० रुपये देण्याबाबत कोणतीही घोषणा झाली नाही. या योजनेबाबतचा निर्णय अर्थसंकल्पात घेतला जाऊ शकतो.
महायुती सरकारने लाडक्या बहिणींना शब्द दिला आहे. त्यानंतर महायुतीच्या अनेक नेत्यांना २१०० रुपयांबाबत वक्तव्य केले आहे. अर्थसंकल्पानंतर महिलांना कदाचित २१०० रुपये दिले जाणार असल्याची माहिती अनेक नेत्यांनी दिली होती. (Ladki Bahin Yojana March Month Installment)
आता १० मार्च रोजी अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. या अर्थसंकल्पात योजनेबाबत महत्त्वाचा निर्णय होऊ शकतो. अर्थमंत्री अजित पवार लाडक्यी बहिणींचा हप्ता वाढवण्याबाबत घोषणा करणार का याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
फेब्रुवारीचा हप्ता कधी?
लाडकी बहीण योजनेत फेब्रुवारीचा हप्ता अद्याप महिलांच्या खात्यात जमा झालेला नाही. लाडक्या बहिणींच्या खात्यात कधी पैसे कधी जम होणार हा प्रश्न विचारला जात आहे. मार्च आणि फेब्रुवारीचे पैसे आत महिलांना एकत्र येतील. त्यामुळे कदाचित पुढच्या महिन्यात महिलांच्या खात्यात ३००० रुपये जमा होऊ शकतात.