Wednesday, March 12, 2025
Homeइचलकरंजीइचलकरंजी : युवकास मारहाण तिघांवर गुन्हा

इचलकरंजी : युवकास मारहाण तिघांवर गुन्हा

पूर्ववैमनस्यातून एकाला कार्यालयात बोलावून घेत पीव्हीसी पाईप, लोखंडी सळी, करवत आणि काठीने बेदम मारहाण करून जखमी केल्याची घटना घडली. सुयश सुनिल घुणके (वय २४ रा. शिरदवाड) असे जखमीचे नाव आहे. याप्रकरणी गावभाग पोलीस ठाण्यात अल्पवयीन बालकासह तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, शिरदवाड येथील सुयश घुणके याचे राजेंद्र शामराव घुणके (वय ४५ रा. शिरदवाड ) हे नात्याने काका आहेत. या काका-पुतण्यांमध्ये वाद असून त्यातूनच वैभव शिवाजी साळुंखे (वय ३० रा. नदीवेस नाका) याने दोन दिवसांपूर्वी सुयश घुणके याला आपल्या मंगलधामनजीकच्या कार्यालयात बोलवून घेतले.

त्याला पत्नीस का फोन लावतोस अशी विचारणा करत वैभव आणि राजेंद्र या दोघांनी पीव्हीसी पाईप, लोखंडी करवत, सळी, काठी आणि प्लास्टिक खुर्चीने बेदम मारहाण केली.

सुयशचा मोबाईल जबरदस्तीने काढून घेतला. मारहाणीमुळे जखमी झालेल्या सुयशवर इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याप्रकरणी सुयश याच्या फिर्यादीनुसार सोमवारी रात्री गावभाग पोलीस ठाण्यात वैभव साळुंखे, राजेंद्र घुणके यांच्यासह एका अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -