55 इंच स्क्रीनसह येणाऱ्या मोठ्या स्मार्ट टीव्हीला निम्म्या किंमतीत खरेदी करण्याची संधी आहे. ई-कॉमर्स साइट फ्लिपकार्टवर iFFALCON by TCL Smart TV बंपर डिस्काउंटसह उपलब्ध आहे.
या टिव्हीवर डिस्काउंटसह बँक ऑफर्सचाही फायदा मिळत आहे. या स्मार्ट टीव्हीवरील ऑफर्सविषयी सविस्तर जाणून घेऊया.
iFFALCON by TCL Smart TV वरील ऑफर
iFFALCON by TCL Smart TV ई-कॉमर्स साइट Flipkart वर बंपर डिस्काउंटसह 25,999 रुपये किंमतीत उपलब्ध आहे. याशिवाय, ठराविक बँक कार्डद्वारे पेमेंट केल्यास 10% डिस्काउंट मिळत आहे. अशाप्रकारे, टीव्हीची किंमत अजून कमी होईल.
टीव्हीवर एक्सचेंज ऑफर देखील उपलब्ध आहे. एक्सचेंज ऑफरवर 5,4000 रुपयांपर्यंत टीव्हीची किंमत कमी होईल. सर्व ऑफरचा फायदा मिळाल्यास टीव्हीला फक्त 20 हजार रुपयांच्या बजेटमध्ये खरेदी करू शकता.
iFFALCON by TCL Smart TV चे फीचर्स
या मोठ्या स्क्रीन असलेल्या स्मार्ट टीव्हीमध्ये Ultra HD (4K) डिस्प्ले दिला असून, याचे रिझॉल्यूशन 3840×2160 पिक्सल आणि रिफ्रेश रेट 60Hz आहे. यामध्ये Google TV ऑपरेटिंग सिस्टम दिली आहे, ज्यामुळे विविध अॅप्सचा सपोर्ट मिळतो.
iFFALCON च्या या टीव्हीमध्ये शानदार ऑडिओ अनुभवासाठी 24W स्पीकर्स देण्यात आले आहेत, जे Dolby Atmos सपोर्ट करतात. हा टीव्ही फ्रेमलेस डिझाइन आणि दमदार फीचर्ससह येतो, ज्यामुळे लॅग-फ्री एक्सपीरियंस मिळतो. तुम्ही जर कमी किंमतीत मोठ्या स्क्रीनसह येणारा स्मार्ट टीव्ही शोधत असाल तर हा तुमच्यासाठी नक्कीच चांगला पर्याय ठरेल.