उकाड्याने हैराण होऊन घराच्या टेरेसवर झोपल्याची संध साधत चोरट्याने ७० हजार रुपये किंमतीचे दोन मोबाईल लंपास केले. ही घटना अवधुतनगर शहापूर येथे पडली. या प्रकरणीचिदानंद श्रीशैल मुंडगनुर (वय३६) यांनी शहापूर पोलिसात दिलीआहे.याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, चिदानंद मुंडगनुर हे अवधुतनगर येथे कुटुंबासह राहण्यास आहेत. सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरु असून उकाड्याने सर्वजण हैराण झाले आहेत. उकाड्यामुळे त्रस्त झालेले मुंडगनुर कुटुंबिय हे रविवारी रात्री टेरेसवर झोपले होते. हीच संधी साधत चोरट्याने टेरेसवर प्रवेश करत तेथे ठेवलेला ६० हजाराचा आयफोन आणि १० हजाराचा विवो फोन असे दोन मोबाईल चोरुन नेले. या प्रकरणी शहापूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -