निरगुडसर (ता. आंबेगाव) येथे विजेचा शॉक बसून ज्ञानेश्वर मारूती टाव्हरे (वय -६०) यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना निरगुडसर येथे सकाळच्या सुमारास घडली. याबाबत नवनाथ तुकाराम टाव्हरे यांनी पारगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
पारगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी १ एप्रिल रोजी सकाळी ७ वाजून ४५ मिनिटांनी फिर्यादी नवनाथ टाव्हरे हे गावात मोटार वायरींगच्या दुकानावर गेले असता त्यांना सकाळी ८ वाजून ५० मिनिटांनी त्यांचा चुलत भाऊ अक्षय बाळासाहेब टाव्हरे यांनी फोन करून सांगितले की, मी हाडवळा नावाच्या शेतामध्ये काम करत असताना चुलते ज्ञानेश्वर मारूती टाव्हरे (वय-६० वर्षे) यांना इलेक्ट्रीक मोटरच्या स्टाटर बॉक्सला करंट लागुन ते बेशुध्द पडलेले आहेत असे सांगितले.
त्यावर शेतामध्ये जात असताना चुलत भाऊ अक्षय टाव्हरे हा चुलते ज्ञानेश्वर टाव्हरे यांना ॲम्ब्युलन्मध्ये घेवुन मंचर येथे चालला होता, मी पण सोबत मंचर येथे ग्रामीण उप जिल्हा रुग्णालयात गेलो. परंतु डॉक्टरांनी चुलते ज्ञानेश्वर मारूती टाव्हरे यांना तपासुन ते उपचारापुर्वी सकाळी ९.३० वा मयत झाल्याचे सांगितले.