कर्नाटकच्या गडगमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका 24 वर्षांच्या नवविवाहीतेनं आत्महत्या केली आहे. लग्नानंतर अवघ्या चार महिन्यांतच या तरुणीनं गळफास घेऊन आपलं आयुष्य संपवलं. या घटनेनं खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या महिलेचा दीर आणि सासू या तरुणीला तिच्या रंगावरून सतत टोमणे मारत होते. याला कंटाळून अखेर या तरुणीने आत्महत्या केली असल्याचं प्राथमिक तपासात समोर आलं आहे.
ही तरुणी बेल्लारी येथील रहिवासी होती, तिचं लग्न चार महिन्यांपूर्वी अमरेश नावाच्या एका व्यक्तीसोबत झालं होतं. तिचा पती शरणबसवेश्वर नगर, बेटगेरीचा रहिवासी आहे. या तरुणीला लग्नाच्या काही दिवसांनंतर तिच्या काळ्या रंगावरून तिची सासू शशिकला आणि तिचा दीर वीरनगौडा यांनी टोमणे मारण्यास सुरुवात केली. तिच्या रंगावरून तिचा मानसिक छळ करण्यात आला. सततच्या छळाला कंटाळून अखेर या तरुणीने गळफास घेऊन आपलं आयुष्य संपवलं आहे. या तरुणीच्या आई वडिलांनी दाखल केलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी दोन आरोपींना अटक केलं आहे. त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. या महिलेचा पती एका खासगी कंपनीमध्ये काम करतो.
सासू आणि दीराला अटक
समोर आलेल्या माहितीनुसार सासू आणि दीर या तरुणीचा मानसिक छळ करायचे, तिच्या काळ्या रंगावरून सतत तिला टोमणे मारायचे, अखेर या तरुणीने आपलं आयुष्य संपवलं आहे, या तरुणीच्या आई-वडिलांनी दाखल केलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी या प्रकरणात मुलीची सासू शशिकला आणि तिचा दीर वीरनगौडा यांना अटक केलं आहे. त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. या महिलेनं 15 एप्रिलला गळफास घेऊ आपलं आयुष्य संपवलं. आरोपींना अटक करण्यात आलं असून, घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे, या प्रकरणाला जबाबदार असलेल्या आरोपींना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी करण्यात येत आहे.