सोन्याची किंमत सध्या वाढतानाच दिसतेय. (prices)अक्षय्य तृतीया जवळ आल्याने अनेकजण सोन्याची खरेदी करण्यासाठी जातात. मात्र आज सोन्याची किंमत कमी झाली आहे. सलग तिसऱ्या दिवशी सोन्याच्या किमतीत घसरण पाहायला मिळतेय. काल सोन्याचा भाव 99,000 रूपयांवर पोहोचला होता. तर आज बुलियन मार्केटमध्ये १० ग्रॅम सोन्याच्या किमतीत सलग तिसऱ्या दिवशी घसरण झालीये.सराफा बाजारात २२ कॅरेट सोन्याच्या भाव आज 90,000 आहे तर २४ कॅरेट सोन्याचा प्रति १० ग्रॅमसाठी भाव 98,200 च्या जवळ आहे. याशिवाय चांदी एक लाख रूपयांच्या वर आहे.
चांदीचा रेट काय आहे?
शुक्रवारी २५ एप्रिल रोजी चांदीच्या भावात घसरण (prices) झाली आहे. चांदीची किंमत आज 1,00,800 रूपये आहे. कालच्या किमतीच्या तुलनेत आज चांदीचा भाव १०० रूपयांनी कमी झाला आहे. त्यामुळे आजच्या दिवशी चांदीची खरेदी करणं तुम्हाला फायदेशीर होणार आहे.
दिल्ली आणि मुंबईत सोन्याचा भाव
शुक्रवारी २५ एप्रिल रोजी दिल्लीमध्ये २२ कॅरेट सोन्याचा भाव 90,190 रूपये आहे. तर २४ कॅरेट सोन्याचा भाव 98,330 रूपये आहे. ही १० ग्रॅम सोन्याची किंम आहे. दिल्लीच्या तुलनेत मुंबईमध्ये सोन्याचा भाव कमी आहे. मुंबईमध्ये २२ ग्रॅम सोन्याची किंमत 90,040 रूपये आणि २४ कॅरेट सोन्याचा भाव 98,230 आहे. (prices)एकंदरीत पाहिल्यास कालच्या तुलनेत सोन्याच्या भावात किरकोळ घट झाली आहे.
22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम
दिल्ली- 90,190
चेन्नई- 90,040
मुंबई- 90,040
कोलकाता- 90,040
जयपुर- 90,190
नोएडा- 90,190
24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम
दिल्ली- 98,330
चेन्नई- 98,230
मुंबई- 98,230
कोलकाता- 98,230
जयपुर- 98,330
नोएडा- 98,330